Saturday, April 20, 2024
HomeNewsबाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षाचालकावर संक्रांत - काशिनाथ नखाते.

बाईक टॅक्सीला परवानगी दिल्यास रिक्षाचालकावर संक्रांत – काशिनाथ नखाते.

रिक्षा चालकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि. २५- महाराष्ट्र राज्यात विविध शहरांमध्ये बेकायदेशीर रित्या बाईक टॅक्सी सुरू आहे सरकारची परवानगी न घेता मोबाईल ऐपद्वारे बुकिंग करून बाईक टॅक्सी प्रवासी वाहतूक धोकादायक पद्धतीने होते म्हणून न्यायालयाने ते रद्द केले .राज्य सरकारने परिवहन संवर्गात नोंदणी केलेल्या वाहनाचे नियमन करून अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये दुचाकीला परवानगी देण्यासाठी समिती नेमलेली आहे या तुन बाईक टॅक्सी परवानगी सुरू करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करत रिक्षा चालकांनी या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,सारथी चालक मालक महासंघ तर्फे आज बैठक घेऊन निषेध करण्यात आला.यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते, इरफान चौधरी, दिनकर खांडेकर,अशोक पवार, आदीक बोऱ्हाडे,रामा कांबळे,राजू व्हणमाने,बालाजी भोसले, गुलाब बागवान, सहदेव व्हणमाने, फरीद शेख आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्यामध्ये रिक्षा चालकानी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून बाईक टॅक्सीचा विरोधातील लढा यशस्वी केल्यानंतर राज्य शासनाच्या मनामध्ये वेगळीच भूमिका असून रिक्षा चालकांचे वाटोळे करण्याचा प्रकार आहे, राज्यात दुचाकी संवर्गातील वाहनांना प्रवाशांच्या वाहतुकीसाठी परिवहन संवर्गात नोंदणी करून अग्रीगेटर म्हणून महाराष्ट्रात सेवा देण्यासाठी समिती स्थापन केलेले असून यासाठी माजी सनदी अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करून बाईक टॅक्सीला परवानगी देण्याचा प्रयत्न असून हे अत्यंत चुकीचे असून यामुळे रिक्षाचालकावरती मोठी संक्रांत येणार असून ते कमी दरात देत असल्यामुळे रिक्षा चालकांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असून तसेच प्रवाशांच्या सुरक्षेला बाबतीत मोठा धोका होणार आहे. हा अहवाल सकारात्मक सादर करून राज्य शासन परवाना देण्याचा विचारात आहे .

काही काळ रिक्षा चालवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी याचा विचार करून, यावर बंदी कायमस्वरूपी ठेवावी अन्यथा शिंदे सरकारच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील रिक्षा चालक तीव्र आंदोलन करतील असा इशारा दिला आहे .
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय