Friday, April 19, 2024
Homeराजकारणनवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही, पोलिसांच्या पत्नीचा राणांना सज्जड दम

नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही, पोलिसांच्या पत्नीचा राणांना सज्जड दम

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील कथित लव्ह जिहाद प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांसोबत हुज्जत घालत मोठा राडा केला होता. आता पोलिस स्टेशनमध्ये गोंधळ घालणं नवनीत राणांच्या चांगलच अंगलट आलं आहे.

अमरावती खासदार नवनीत राणा यांनी गांधी नगर येथील लव्ह जिहाद प्रकरणावरून मी फोन केला तेव्हा माझा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला आहे, असं म्हणत राणा यांनी पोलिसांवर आगपाखड केली होती. या प्रकरणावरून नवनीत राणा यांच्याविरोधात पोलिसांच्या कुटूंबीयांनी जोरदार आंदोलनही केले. मात्र आता पोलिस पत्नी वर्षा भोयर या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. पोलिसांबद्दल तू नेहमीच अपशब्द वापरतेस. आता मात्र तुला त्यांची माफि मागावी लागेल. अन्यथा तुला सोडणार नाही, असा इशारा वर्षा भोयर यांनी नवनीत राणांना दिला आहे.

दरम्यान, नवनीत राणांनी पोलिसांशी हुज्जत घालत कॅमेऱ्यासमोर प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून आता पोलिसांचे कुटुंबीय मात्र आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय