Sunday, July 14, 2024
Homeकृषीनैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट आर्थिक मदत केंद्र सरकारच्या योजना...

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार दुप्पट आर्थिक मदत केंद्र सरकारच्या योजना बाबत जाणून घ्या !

पुणे: सरकार शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेती यासाठी वेगवेगळ्या योजनाही आणत असत. जेणेकरून शेतकरी या योजनांचा फायदा घेत नैसर्गिक शेती करण्याकडे भर देतील.

सध्या केंद्र सरकारने झिरो बजेट शेती म्हणजेच नैसर्गिक शेतीवर जास्तीत जास्त भर दिला आहे. सरकार शेतकऱ्यांनी या शेतीचा (Agriculture) अवलंब करावा यासाठी एकापेक्षा एक युक्त्या लढवत प्रयत्न करत आहे. आता सरकारने नैसर्गिक शेतीची (Natural Farming) निवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीची तरतूद केली आहे. चला तर मग जाणून घेऊया सरकारने नैसर्गिक शेतीची निवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी नक्की काय आर्थिक तरतूद केली आहे.

नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत

सरकारने यापूर्वी नैसर्गिक शेतीचा अवलंब करून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची घोषणा केली होती. ज्यामध्ये आता दुप्पट वाढ करण्याच्या तयारीमध्ये केंद्र सरकार आहे. या नैसर्गिक शेतीसाठी कृषी मंत्रालयाने तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केला आहे. जो आता मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात येईल.

भाजपला धक्का, महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांचा प्रचंड मतांनी विजयी

नैसर्गिक शेती करण्यामागे काय आहे सरकारचा हेतू?

आता आपल्या भारत देशात अन्नधान्य आहे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण हे अन्नधान्य नागरिकांना कितपत नैसर्गिकरित्या पिकवलेले मिळत आहे हे महत्त्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेत आता देशातील नागरिकांना मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करणे गरजेचे आहे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. म्हणूनच सरकारने नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची रक्कम वाढवली आहे. रासायनिक खतांची फवारणी करुन वापरात आलेले अन्नधान्य हे धोक्याचे आहे. याचमुळे 2026 पर्यंत 5 ते 6 लाख हेक्टर क्षेत्र हे नैसर्गिक शेती करण्याचे सरकारचा उद्देश आहे.

हे पहा ऑटोमॅटिक पंचर काढणारे सोल्युशन !

शेतकऱ्यांना दुप्पट मिळणार आर्थिक मदत..

यापूर्वी नैसर्गिक रित्या शेती करणाऱ्या शेतकऱ्यास प्रति हेक्टर 12 हजार 200 रुपये इतकी रक्कम मिळत होती. या रकमेमध्ये सरकारने आता वाढ करणार असून, ती प्रति हेक्टर 32 हजार 500 रुपये इतकी करण्यात येईल. सध्या भारतात नैसर्गिक शेती ही 4 कोटी 9 लाख क्षेत्रावर केली जात आहे. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठीच नाही, तर यामधून मिळणाऱ्या उत्पादनांच्या ब्रँडिंगची तरतूद करण्याची सरकारची योजना आहे.

KGF घालतोय थिएटर मध्ये धुमाकुळ !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय