संग्रहित छायाचित्र |
नांदेड : आशा व गटप्रवर्तकांनी कोरोनाचे नियम पाळून जिल्हा परिषद नांदेड येथे उद्या ( 3 फेब्रुवारी ) होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन सिटू च्या जिल्हाध्यक्ष तथा आशा व गटप्रवर्तक जिल्हाध्यक्ष उज्वला पडलवार यांनी केले आहे.
पडलवर म्हणाल्या, आशा व गटप्रवर्तक संघटनेने नवी दिल्ली येथे विविध मागण्यांसाठी उद्या 3 फेब्रुवारी 2022 रोजी आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे.
शेतकरी – कामगार बेरोजगारांची निराशा करणारे बजेट – कामगार नेते डॉ. डी. एल. कराड
त्यामुळे महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक संघटना सिटूने जिल्हा, तालुका पातळीवर निदर्शने, मोर्चे, आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हा परिषद कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याचेही पडलवार म्हणाल्या.
पुढे बोलताना म्हणाल्या की, आशा व गटप्रवर्तकांनी मोठ्या संख्येने सहभागी न होता पीएसी तून 2 जणांनी सहभागी व्हावे, तर बाकी आशा व गटप्रवर्तकांनी आहे तेथे काम बंद आंदोलन करावे.
‘अंडे आधी की कोंबडी?’ संशोधकांनी शोधले उत्तर
मॉल्समध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा – जनवादी महिला संघटना आक्रमक