घोडेगाव (दि.०८) : नेमावर जि. देवास (मध्य प्रदेश) येथील आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून हत्या व परिवारातील ५ सदस्यांचा खून करणाऱ्या सामूहिक हत्याकांडाच्या निषेधार्थ , मुख्य आरोपी सुरेंद्र चौहान व इतर साथीदारांवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी राष्ट्रीय आदिवासी अधिकार मंच पुणे जिल्हा समितीच्या वतीने आंबेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
याप्रश्नी राष्ट्रपती, तसेच मध्यप्रदेशचे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठविण्यात आली आहेत. निवासी नायब तहसीलदार एस.बी. गवारी यांनी हे निवेदन स्वीकारले .
यावेळी संघटनेचे स्नेहल साबळे , आशा लोहकरे ,एस.एफ.आय.आंबेगाव तालुका समिती सचिव समीर गारे उपस्थित होते.