Wednesday, April 24, 2024
HomeNewsब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात "या" दिवशी राष्ट्रीय दुखवटा जाहीर

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाबद्दल भारतात “या” दिवशी राष्ट्रीय दुखवटा जाहीर

नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II death) यांनी गुरुवारी (ता.८ ऑगस्ट) स्कॉटलंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या ९६ वर्षाच्या होत्या. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शोक व्यक्त केला आहे. आता भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांची शवपेटी पाच दिवसांनी लंडन ते बकिंगहॅम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर पॅलेसमध्ये औपचारिक मार्गाने नेली जाईल. ब्रिटनमध्ये आजपासून १० दिवसांसाठी राजकीय शोक पाळला जाणार आहे. तर भारतात मध्ये देखील राणी एलिझाबेथ यांच्या सन्मानार्थ ११ सप्टेंबरला राष्ट्रीय दुखवटा पाळला जाणार आहे. या सोबतच भारतातील राष्ट्रध्वज अर्धवट राहणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाने जारी केली आहे.

राणी एलिथाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स (Prince Charles ) हे ब्रिटनचे राजे म्हणून आज शनिवारी पदग्रहण करणार आहेत. सध्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळं संपूर्ण ब्रिटन सध्या शोक सागरात बुडाला आहे. ब्रिटनच्या इतिहासात सर्वाधिक काळ महाराणीपद भूषणवलेल्या एलिझाबेथ द्वितीय यांना नागरिकांनी त्यांच्या पॅलेसबाहेर फुलांचे गुच्छ ठेवत श्रद्धांजली अर्पण केली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय