पिंपरी चिंचवड : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय संमेलनात श्री किशोर थोरात यांना “प्राईड ऑफ नेशन” राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या १११ मानकऱ्यांना या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय तसेच राष्ट्रस्तरीय पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले.
नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख
सुप्रसिद्ध इंटरनॅशनल टॅलेंट आयकॉन डॉ. जयलक्ष्मी सानिपीना राव या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.सुप्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ डॉ.हेमाली जोशी या समारंभाच्या विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. सदर पुरस्कार या वरील मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणात आला.
आधार शैक्षणिक संस्थेचे काम असेच वटवृक्षासारखे पुढे नेण्याचा संकल्प किशोर थोरात यांचा असून आधार संस्थेला मदत करणाऱ्यांचे त्यांनी आभार म्हणालेत. मागील वर्षांपासून हा पाचवा पुरस्कार असून, पुरस्काराने अजून त्यांची सामाजिक कार्याची जबाबदारीही वाढलेली आहे असे ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी
त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ या संस्थेने पुणे जिल्हा अध्यक्ष हे पद नुकतेच जाहीर केले. त्यांच्या पुढील कार्यासाठी त्यांना अनेक शुभेच्छा आणि त्यांच्याकडून अशीच देशाची सेवा अखंड घडत राहो. समाजामधील प्रत्येकाने जर सामाजिक कार्य केले आणि देशाच्या प्रगतीत खारीचा वाटा उचलला तर आपला देश महासत्ता बनण्यास फार वेळ लागणार नाही असेही ते म्हणाले. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली.
– क्रांतिकुमार कडुलकर