Thursday, December 12, 2024
HomeNewsदेश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

देश-विदेशातील आजच्या महत्वाच्या टॉप 10 घडामोडी वाचा एका क्लीक वर

? आजच्या जागतिक घडामोडी

१) ऑस्ट्रेलियामधील कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढीमुळे राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या

सिडणी, ऑस्ट्रेलिया: ऑस्ट्रेलियामध्ये कोरोना बाधीतांच्या संख्येत होणाऱ्या वाढीचा वेग लक्षात घेता तेथील राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. १०० वर्षात प्रथमच विक्टोरिया आणि न्युव साऊथ व्हेल राज्यांच्या सीमा बंद केल्या गेल्या.

२) WHO कोरोना हवेमुळे पसरतो याची पडताळणी करणार

PTI: २०० पेक्षा जास्त जागतिक वैज्ञानिकांच्या दाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटना कोरोना हवेतून पसरतो का? याची करणार आहे. काही दिवसांमध्ये वैज्ञानिकांनी कोरोना हवेतून कसा पसरतो याबाबत प्रात्यक्षिक केले होते.

३) ब्रिटिश सरकारने हॉगकॉगमधील ३० लाख लोकांना  ब्रिटनचे नागरिकत्व देण्याची तयारी दाखवली

हॉगकॉग, चीन: ब्रिटिश सरकारने हॉगकॉगावरती चीन सरकारकडून लादल्या जाणाऱ्या नियमांना प्रतिउत्तर म्हणून हॉगकॉगच्या ३० लाख नागरिकांना ब्रिटनचे नागरिकत्व देण्याची तयारी दाखवली .तसेच चीन कडून १९८४ च्या दोन्ही सरकारांनी केलेल्या तहाचे पालन होत नसल्याचे ब्रिटिश सरकार सांगत आहे. याबाबत चीनने ब्रिटनाला हॉगकॉग त्यांचा प्रदेश आहे असे सांगत त्यामध्ये ब्रिटनने कोणतेही आवाहन करून शांतता भंग करू नये असे सांगितले.

४) भविष्यात रोगांचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी वातावरणातील बदल थांबवावा लागेल आणि पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे: UN चा अहवाल

नैरोबी: प्रदुषणात वाढ, मोठ्याप्रमाणात जंगलतोड, जमिनीचे प्रदुषण यामुळे जागतिक तापमान वाढ होत आहे आणि त्यामुळे हवामानात मोठे बदल होत आहेत. तसेच त्याचे सजीवांमध्ये मोठे बदल घडत आहेत. त्यामुळे भविष्यात साथीच्या रोगांचा प्रार्दुभाव थांबवण्यासाठी आताच हवामान बदल थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे आणि पर्यावरण वाचवले पाहिजे असे UN अहवालात सांगितले आहे.

५) ब्रिटने मानवी हक्काचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक निर्बंध लावले

लंडन, ब्रिटन: रशिया, सौदी अरेबिया आणि उत्तर कोरियातील वैयक्तिक आणि समूहांला लक्ष करून ब्रिटनने हा नियम लागू केला. यामुळे त्यांवर मोठ्याप्रमाणात आर्थिक निर्बंध लादले जातात.

६) अफगानिस्थानच्या राष्ट्राध्यक्ष अश्रफ गणीने तालिबानबरोबर चर्चेसाठी जागतिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले

काबूल, अफगानिस्थान: तालिबानबरोबर चर्चा ही जागतिक पातळीवरती झाली पाहिजे. तालिबान ही जागतिक पातळीवरती काम करत आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष गणींनी २० देशाच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली.

७) नेपाळचे पंतप्रधान ओलींचे भविष्य नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षाच्या अधिवेशनात ठरणार

काठमांडू, नेपाळ: अंतर्गत कलहामुळे सत्ते असलेले नेपाळचे पंतप्रधान ओलींना नेपाळच्या कम्युनिष्ट पक्षाचे तातडीचे अधिवेशन बोलावण्याची वेळ आली आहे. त्या अधिवेशनात त्यांना पंतप्रधान पदावर ठेवायचे की नाही याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

८) चीनच्या १.१ कोटी विद्यार्थ्यांनी कॉलेज प्रवेशाची परिक्षा देणार

बीजिंग, चीन: चीनमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव झाल्यानंतर थांबलेल्या प्रवेश परिक्षा गुरुवार पासून सुरु केल्या. १.१ कोटी विद्यार्थी त्यात सहभाग घेणार असून त्यांच्यावर कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे. या प्रवेश परिक्षा १४ दिवस चालणार आहेत.

९) भारताचे सैन्य १.५ किमी वादग्रस्त जागेपासून मागे सरले: भारत सरकार

दिल्ली, भारत: चीनचे सैन्य द्विपक्षिय चर्चेनंतर २ किमीमागे गेल्यानंतर भारताचे सैन्य १.५ किमी वादग्रस्त जागेपासून मागे सरले. 


१०) रशिया ब्रिटनवरती आर्थिक निर्बंध लावण्याच्या तयारीत: रशियन सरकार

मॉस्को, रशिया: ब्रिटनने मानवी हक्काचे उल्लंघन केल्याचे सांगून रशियाच्या २५ व्यक्ती आणि समुहावरती निर्बंध लावल्यानंतर रशियासुद्धा असे निर्बंध ब्रिटनवरती लावण्याच्या तयारीत असल्याचे रशियन सरकारकडून सांगितले जात आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय