१) चीनी सैन्य गॅलवॉन व्हॅलीपासून २ किमी मागे सरकले: भारत सरकार
दिल्ली, भारत: दोन्ही देशाच्या द्विपक्षीय बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयानंतर चीनने आपले सैन्य वादग्रस्त प्रदेशातून २ किमी मागे घेतले. काही दिवसांपूर्वी तेथेच सैन्यांमध्ये झडप होऊन भारताचे २० जवान शहिद झाले होते.
२) नवीन पारित होत असलेल्या कायद्यानुसार ८ लाख भारतीयांना कुवेतमधील नोकरी गमवावी लागणार
पीटीआय: कुवेतमध्ये नुकत्याच येऊ पाहत असलेल्या कायद्यानुसार परदेशी कामगारांवरती मर्यादा येणार आहे. त्यामुळे ८ लाखपेक्षा जास्त भारतीय जे कामानिमित्त कुवेतला गेले आहेत त्यांना बसणार आहे.
३) पाकिस्तानने भारतीय हायकमिशनरला शस्त्रसंधीचे भारताकडून उल्लंघन होत आहे अशी समज दिली.
इस्लामाबाद,पाकिस्तान: पाकिस्तान सरकारने भारतीय दुतावासातील हायकमिशनरला भारताकडून शस्त्रसंधीने उल्लंघन होत आहे, त्याबाबत समज दिली. याबाबत भारत सरकारकडून अजून कोणती घोषणा करण्यात आलेली नाही.
४) चीनच्या मंगोलिया प्रांतामध्ये बुबोनिक प्लेग सदृश आजारी व्यक्ती आढळली
बीजिंग,चीन: चीनमध्ये बुबोनिक प्लेग सदृश आजारी व्यक्ती आढळला. बुबोनिक प्लेगलाचा मध्ययुगात काळा मृत्यु म्हणत असत.
५) भारतीय अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या प्रार्दुभावामूळे बसलेल्या धक्क्यातून उभारी घेण्यासाठी ५० ते ६० लाख कोटीच्या परकिय गुंतवणुकीची गरज: नितीन गडकरी.
दिल्ली,भारत: भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या चक्रात सापडली असून तिला बाहेर काढण्यासाठी ५० ते ६० लाख कोटीच्या परकिय गुंतवणुकीची गरज आहे असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केले. परंतु, परकिय गुंतवणुक भारतात कशी येऊ शकेल याबाबत त्यांच्याकडून कोणतीही स्पष्टोक्ति आलेली नाही.
६) विद्यापीठ अनुदान आयोगाने(UGC) शेवटच्या वर्षाच्या परिक्षेबाबत अजून कोणतीही ठोस भुमिका घेतलेली नसल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात.
दिल्ली, भारत: विद्यापीठ अनुदान आयोगाने शेवटच्या वर्षाच्या परिक्षांबाबत ठोस भूमिका न घेतल्यामूळे विद्यार्थी वर्ग संभ्रमात आहे. गेले किती दिवस हा प्रश्न घोळावत असल्यामुळे विद्यार्थी वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे.
७) रिलायंस कंपनीने भांडवली बाजर भावानुसार ११.५ लाख कोटीचा टप्पा पार केला.
मुंबई, भारत: भारतातील रिलायंस कंपनी भांडवली गुंतवणुकीच्या बाजार भावानुसार ११.५ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार पाडला. भारतातील कंपन्यामध्ये एवढा बाजारभाव असलेली रिलायंस ही प्रथम कंपनी ठरली.
८) इराणच्या अणुभट्टीमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले: स्पष्टोक्ता.
इराण: इराणमध्ये असलेल्या अणुभट्टीमध्ये आग लागली होती. त्यामुळे तेथील यंत्रणेचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्याबाबत इराण सरकारकडून कोणतीही सुचना प्राप्त झालेली नाही.
९) स्पेनने दुसऱ्यांना संचारबंदीचे आदेश दिले.
स्पेन: स्पेनने दुसऱ्यांदा संचारबंदीचे आदेश पारित केले आहेत. तेथील स्थानिक स्वराज्य संस्थांनी शहरामधील हालचालीला परवानगी दिलेली आहे.
१०) दारू पिणाऱ्या व्यक्ती सोशल डिस्टंसिग पाळत नाहीत: लंडन पोलिस
लंडन, युके: Pubs परत सुरू करण्याच्या UK सरकारच्या निर्णायामूळे लंडन पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे. दारू पिणाऱ्या व्यक्ती सोशल डिस्टंसिगचे पालन करत नाही असे लंडन पोलिसांनी माहिती दिली आहे.