Friday, November 22, 2024
Homeजिल्हाNashik : आशा व गटप्रवर्तकांचे ठिय्या आंदोलन व संप तुर्तास स्थगित

Nashik : आशा व गटप्रवर्तकांचे ठिय्या आंदोलन व संप तुर्तास स्थगित

नाशिक (Nashik) : आझाद मैदान, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती च्या नेतृत्वाखाली आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय कृती समितीने एकमताने घेतला असल्याची माहिती एम.ए.पाटील, राजू देसले, आनंदी अवघडे, भगवान देशमुख, पुष्पा पाटील, मंदा डोंगरे, सुवर्णा कांबळे, रंजना गारोळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली. अर्थमंत्री व मुख्यमंत्री यांच्या जाहीर ठोस आश्वासनामुळे आझाद मैदान मुंबई येथील ठिय्या आंदोलन व संपास तुर्त स्थगिती दिली आहे. Workers Protest in Mumbai 

महाराष्ट्र राज्य आशा – गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या माध्यमातून 18 ऑक्टोबर 2023 ते 9 नोव्हेंबर 2023 दरम्यान संप केला. 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्यमंत्र्यांनी आशांच्या मोबदल्यात 7000 व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 6200 रुपये वाढ करण्याचे जाहीर केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी भेटून गटप्रवर्तकांना सहा हजार दोनशे वरून दहा हजार वाढ करण्याचे घोषित झाले. सदर वाढीचा जीआर राज्य शासनाने 12 जानेवारी 2024 च्या अगोदर काढावा अन्यथा 12 जानेवारीपासून राज्यातील आशा व गटप्रवर्तक  बेमुदत संपावर जातील, अशी नोटीस कृति समितीने राज्य शासनास दिली. परंतु कृति समितीने दिलेल्या मुदतीत शासनाने जि.आर.न काढल्यामुळे नाईलाजाने संप करावा लागला.

दि.7 फेब्रुवारी 2024 रोजी  शहापुर ते ठाणे पदयात्रा काढुन 9 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे 20 हजार आशा व गटप्रवर्तकांनी मा.मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन जी. आर.काढण्यासाठी साकडे घातले. 9 व 10 तारखेला दोन दिवस मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ठाणे येथे रस्त्यावर आंदोलन केले. जीआर काढण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तेथून आंदोलन आझाद मैदान मुंबई येथे स्थलांतरित करून 11 फेब्रवारी ते 1 मार्च 2024 पर्यंत सुमारे 20 दिवस आझाद मैदान मुंबई येथे ठिय्या आंदोलन केले.ठाणे व मुंबई असे मिळुन  22 दिवस ठिय्या आंदोलन व सुमारे 50 दिवस संप करुन सरकारला राज्यातील आशा व गटप्रवर्तकांनी जेरीस आणले. 

आशा व गटप्रवर्तकांच्या तीव्र व सलग चिकाटीच्या लढ्यामुळे सरकारवर निश्चितच दबाव निर्माण झाला. त्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानभवनात अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांनी आशा व गट प्रवर्तकांना मानधनात वाढ करण्याचे जाहीर व ठोस आश्वासन दिले.

3 मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राज्यात राबवली जात असल्यामुळे सध्या प्रचंड दडपशाही आशा व गटप्रवर्तकांवर होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने 368 आशांना कार्यमुक्त केले आहे. तसेच अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशांना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कार्यमुक्त केल्याचे आदेश आज काढले आहेत. या धर्तीवर राज्यातील सर्वच आशा व गटप्रवर्तकांना कार्यमुक्त करण्याचे आदेश राज्यभर निघत असल्यामुळे बहुतांश आशा व गटप्रवर्तकांचा कल कामावर रुजू होण्याचा आहे हे कृती समितीच्या लक्षात आले. बऱ्याच गटप्रवर्तक संपात सहभागी नव्हत्या तर राहिलेल्या गटप्रवर्तक या उद्या कामावर हजर होणार होत्या. अशा परिस्थितीत सर्वानुमते आझाद मैदान मुंबई येथील ठिय्या आंदोलन व संप तुर्त स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तकांनी उद्या दि.2 मार्च 2024 पासून आपापल्या नित्याच्या कामाला सुरुवात करावी व पल्स पोलिओ लसिकण मोहीमेत सहभाग घ्यावा, असेही कृती समितीने म्हटले आहे. ‌

मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांच्याकडून जाहीर ठोस आश्वासन मिळवण्यासाठी कृती समितीला माजी आमदार जे. पी गावित, आमदार विनोद निकोले, डॉ‌.डी.एल.कराड यांनी सहकार्य केल्याबद्दल कृती समितीने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. शिष्टमंडळ मुख्यमंत्री व पाच विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून आले आहे त्याचे लेखी आज संघटनेला मिळणार आहे, याच आधारावर काही दिवसातच आपण जीआर मिळवणार आहोत, असेही कृती समितीने म्हटले आहे.

आझाद मैदान मुंबई येथील आंदोलन स्थळी येवुन आ.विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते विधान सभा, आ.अंबादास दानवे विरोधीपक्षनेते विधान परिषद, आ.बाळासाहेब थोरात, आ.रोहित पवार, आयटक राज्य सरचिटणीस कॉ.श्यामजी काळे, कॉ सी आय टी यु चे राज्यसचिव एम एच शेख, माकपचे राज्य सेक्रेटरी कॉ. उदय नारकर व विविध पक्षाचे आमदार तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी येऊन जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचेही कृती समितीने आभार व्यक्त केले. विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवळ यांनीही कृती समितीच्या अधिकाऱ्यांसोबत भेटी घडवून आणल्या त्याबद्दल कृती समितीने त्यांचे आभार व्यक्त केले.

 भगिनींनो, आपण लढाई हरलो नाहीत. आपल्या झालेल्या आंदोलनाच्या खूप दबाव सरकारवर होता शिवाय आपल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी आलेले विरोधी पक्ष नेते यांनी विधानभवनात या सत्ताधारी मंत्र्यांना हैराण करून सोडले होते त्यामुळे कोणीही आपला संप वाया गेला असे समजू नये ,कृती समिती जीआर काढण्यासाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून जीआर काढूनच घेणार आहे. याबद्दल कृती समिती वचनबद्ध आहे. आपण संप व आंदोलन मागे घेतले नसून तुर्त स्थगित केले आहे. आपण शासनाला जीआर काढण्यासाठी वेळ देत आहोत. आशा व गटप्रवर्तकांच्या विश्वासास अजिबात तडा कृती समिती जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काच्या व रास्त मागण्यासाठी कृती समिती वचनबद्ध व कटीबध्द आहे. आपल्याला आज माघार घ्यावी लागली आहे कारण शंभर टक्के गटप्रवर्तक या संपात सहभागी नव्हत्या जर शंभर टक्के गटप्रवर्तक संपात सहभागी असत्या तर त्यांनी रिपोर्टिंग केले नसते व आपला जीआर लवकर निघायला मदत झाली असती आपल्याला आज जी काही माघार घ्यावी लागते त्याचे सर्व श्रेय आपल्या महान भगिनी गटप्रवर्तक जे आपल्या संपात सहभागी झाल्या नव्हत्या व त्यांनी आपल्या आशा ना ही सहभागी होऊन दिलं नाही त्यांच आहे.

राज्यभर संप काळात आशा व गटप्रवर्तकांवर केलेली कारवाई त्वरीत मागे घ्यावी. तसेच संप काळातला  आशा व  गटप्रवर्तकाचे वेतन कपात करू नये, अशी मागणी शासनाकडे केली आहे.

कृती समितीच्या निर्णयाक बैठकीत राजू देसले, विनोद झोडगे, डॉ.डी.एल.कराड, माजी आमदार जे.पी.गावित, दत्ता देशमुख, सचिन आंधळे, निलेश दातखिळे, पुष्पा पाटील, आनंदी अवघडे, उज्वला पाटील, आरमायटी इराणी, उज्वला पडलवार यांचा सहभाग होता.

संबंधित लेख

लोकप्रिय