Wednesday, February 5, 2025

नाशिक : त्रंबक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांचे आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन

नाशिक : त्रंबक तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांचे निवेदन आरोग्य अधिकाऱ्यांना दिले.

राज्यातील सुमारे 70 हजार आशा कर्मचारी व गटप्रवर्तक बेमुदत संपावर आहेत. आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचार्‍यांचा दर्जा द्यावा, तोपर्यंत18 हजार रुपये किमान वेतन आशांना दरमहा 18, 000 रुपये, गटप्रवर्तकांना दरमहा 22, 000 रुपये याप्रमाणे किमान वेतन मिळावे व कोविड महामारीत केलेल्या कामासाठी प्रोत्साहन भत्ता शहरी व ग्रामीण भागातील आशा आणि गटप्रवर्तक यांना मिळावा, 

निश्चित मानधनात या काळात कपात करण्यात आली आहे ती परत द्यावी, सर्व मोबदल्याच्या थकीत रकमा तातडीने अदा करण्यात याव्यात, आशा कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत भरती करताना प्राधान्य देण्यात यावे या मागण्यांसाठी हा संप आहे.

निवेदन देतेवेळी कल्पना शिंदे, संगिता भोये, पुष्पा भोये, मंगल शिंदे, मंगल सुबर, पदमा महाले, संगीता अवतार गांगुर्डे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा उपस्थित होत्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles