Nashik Kidnapping : प्रेमविवाहानंतर अवघ्या दोन महिन्यांतच पतीच्या हिंसक वर्तनामुळे माहेरी गेलेल्या पत्नीचं थेट अपहरण केल्याची धक्कादायक घटना सिन्नर तालुक्यात घडली. वैभव पवार (रा. सिन्नर) याने पत्नी कल्याणी दळवी हिचं तिच्या माहेराहून अपहरण केलं. या घटनेचा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही घटना 19 मार्च रोजी सिन्नरच्या पांगरी गावात घडली. कल्याणी दळवी हिने 20 जानेवारी 2025 रोजी वैभव पवारसोबत प्रेमविवाह केला होता. मात्र, लग्नानंतर काही काळातच वैभवने तिच्यावर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्रस्त होऊन कल्याणी 8 मार्चला माहेरी परतली. या घटनेचा राग मनात ठेवून वैभवने तिचे अपहरण करण्याचा कट रचला.
अपहरणाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद
19 मार्च रोजी कल्याणी तिच्या आई आणि भावासोबत पांगरी येथे असताना अचानक वैभव चारचाकी गाडीतून मित्रांसह आला. त्याने पत्नीवर झडप घेत तिला जबरदस्तीने गाडीत कोंबलं. या वेळी तिला वाचवण्यासाठी आलेल्या आईलाही मारहाण करण्यात आली.
Nashik Kidnapping | पोलिसांकडून गुन्हा दाखल
कल्याणीच्या तक्रारीनंतर पती वैभव पवार आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे आणि सहायक निरीक्षक गणेश शिंदे करत आहेत.

हे ही वाचा :
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच, अहवालात खळबळजनक खुलासे
पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजार ८०० शिक्षकांची भरती
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार, दिशा सालियन प्रकरणी वडिलांचे गंभीर आरोप
राज्यात लवकरच 10,500 रिक्त पदांसाठी पोलीस भरती होणार ; देवेंद्र फडणवीसांची घोषणा
नागपूर हिंसाचार प्रकरण ; हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले पोलिसांसमोर आत्मसमर्पण