Monday, February 17, 2025

नाशिक : जयपालसिंह मुंडा व सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी

जयपाल सिंह मुंडा व सावित्रीबाई फुले यांची.संयुक्त जयंती साजरी करताना मान्यवर..

नाशिक / सुशिल कुवर : नाशिक येथील महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान तर्फे केंद्रीय कार्यालय नाशिक येथे संविधान सभा सदस्य, भारतीय हॉकी संघाचे कॅप्टन, झारखंड आंदोलनाचे एक सर्वोच्च नेता, संविधान सभामध्ये आदिवासीसाठी आग्रह धरणारे, राजनीती, पत्रकार, लेखक, संपादक, आदिवासी समाजातील पहिले आय सी एस झालेले जयपाल सिंह मुंडा व आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

आदिवासींच्या संघटनांचे प्रतिनिधी, एकलव्य अभ्यासिकेचे विद्यार्थी आणि आदिवासी बचाव अभियानाचे कार्यकर्ते, पदाधिकारांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. केंद्रीय अध्यक्ष प्रा. अशोक बागुल, केंद्रीय सरचिटणीस किसन ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सर्व बांधवानी जयपाल सिंह मुंडा व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. 

२९ वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन राजस्थान येथे होणार !

तसेच आदिवासी एकता परिषद आयोजित २९ वे आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेलन राजस्थान मधील प्रतापगढ येथे होत आहे. सदर ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी नियोजन करण्यात आले.

याप्रसंगी कृष्णा गावीत, जयवंत गारे, नानू पाडवी, आदिवासी कवी रमेश भोये, डॉ. जगदीश चौरे, गीतेश्वर खोटरे, रमेश साबळे, प्रदिप इंपाळ, नामदेव ठाकरे, विजय घुटे, विजय पवार, पवन शिरकांडे, राहुल गावित, विशाल गावित आदी उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles