Friday, April 19, 2024
Homeकृषीनाशिक : केंद्र सरकारने कृषी कायद्यांसह पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्यासाठी निदर्शने...

नाशिक : केंद्र सरकारने कृषी कायद्यांसह पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करण्यासाठी निदर्शने !

नाशिक : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायदे, प्रस्तावित वीज बिल कायदा रद्द करावा. पेट्रोल डिझेल दरवाढ रद्द करावी महागाई वाढ रोखा यासाठी देशभर आंदोलन ची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समिती, भारत किसान मोर्चा ने दिली आहे. बहुजन शेतकरी संघटना, किसान सभा, आयटक वतीने सिन्नर फाटा नाशिकरोड येथे ट्रॅक्टर वर बसून हातात फलक घेऊन घोषणा दिल्या.  

राज्य सरकारने कृषी कायद्यात सुधारणा निर्णय घेतलेल्या निर्णयाचाही निषेध करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असतांना सुधारित कायदा कसा करू शकता असा प्रश्न उपस्थित केला. राज्यातील शेतकरी संघटना महाविकास आघाडी नेत्यांना अधिवेशन पूर्वी भेटून अधिवेशनात केंद्र सरकार कृषी कायदा रद्द करण्याचा ठराव मांडण्यात यावा असे आवाहन केले होते. मात्र राज्य सरकारने आमची निराशा केली आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारच्या कायदा विरोधात भूमिका घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी किसान सभेचे राजू देसले, बहुजन शेतकरी संघटनेचे रमेश औटे, अशोक खालकर, नामदेव बोराडे, सुदाम बोराडे, आयटक जिल्हा अध्यक्ष व्ही. डी. धनवटे, ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन राज्य अध्यक्ष विराज देवांग, जिल्हा अध्यक्ष अविनाश दोंदे, मधुकर सातपुते हे उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय