नाशिक / केशव पवार : बिरसा क्रांती दलाच्या नाशिक जिल्हा सहसचिवपदी भारत पाडवी यांची निवड करण्यात आली आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आत्मसन्मानासाठी अस्तित्व अस्मिता व संरक्षणासाठी आणि शिस्त, शिक्षण, संस्कृती संवर्धनासाठी एका वैचारिक व कॅडरबेस संघटनेची आवश्यकता होती ही आदिवासी समाजाची गरज लक्षात घेऊन बिरसा क्रांती दल या कॅडरबेस संघटनेची निर्मिती झाली आहे.
बिरसा क्रांती दल संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ मडावी यांच्या सुचनेनुसार ही निवड करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रंगराव काळे, उपाध्यक्ष डी. बी. अंबुरे, राज्य सचिव चिंधू आढळ, राज्य उपाध्यक्ष विजय आढारी, नाशिक जिल्हा अध्यक्ष सुनिल खराटे, उपाध्यक्ष किशोर माळी, उपाध्यक्ष योगेश लहांगे,जिल्हा सचिव बाळू कचरे, संघटक नामदेव झोंबाड, प्रसिद्ध प्रमुख भिमराव जाधव, सहसंघटक किरण लहांगे, इगतपुरी तालुका अध्यक्ष रामदास लहांगे,
नाशिक तालुका अध्यक्ष गणेश वारघडे, उपाध्यक्ष गणेश लांडे, त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष युवराज गारे, उपाध्यक्ष रमेश जाधव, संदिप लहांगे, पेठ तालुका अध्यक्ष मधुकर पाडवी, येवला तालुका अध्यक्ष विजय माळी, दिंडोरी तालुका अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष शंकर वासले, संघटक, रवी गायकवाड, एकनाथ गायकवाड, दिंडोरी तालुका सचिव पुंडलिक वाघेरे, महिला आघाडी अध्यक्षा कविता भोंडवे, योगिराज भांगरे, सनी पावडे, रवी निंबेकर आदीसह ऑनलाईन उपस्थित होते. तसेच या निवडीचे श्रेय पेठ तालुका अध्यक्ष मधुकर पाडवी यांना जाते.