Thursday, August 11, 2022
Homeग्रामीणनाशिक : आगमन पावसाचे, दर्शनअप्रतिम निर्सग सौदर्याचे.....! पहा भिवतास धबधब्याचा व्हिडीओ !

नाशिक : आगमन पावसाचे, दर्शनअप्रतिम निर्सग सौदर्याचे…..! पहा भिवतास धबधब्याचा व्हिडीओ !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

सुरगाणा / दौलत चौधरी : नाशिक जिल्ह्याला निर्सगाने भरभरून निर्सग सौंदर्य दिले आहे त्यापैकीच एक नैसर्गिक देणगी म्हणजेच सुरगाणा तालुक्यातील केळावण- खोकरविहीर सिमेवर असलेला नयनरम्य भिवतास धबधबा, मान्सुनचे आगमन होताच हा धबधबा वाहण्यास सुरवात होते. त्याच बरोबर सदरचा परिसरही अतिशय सुंदर आणि मनमोहक रुप धारण करतो, हा धबधबा पाहण्यासाठी महाराष्ट्र तसेच गुजरात राज्यातुन अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. आणि अप्रतिम निर्सग सौंदर्याचा आंनद लुटत असतात. 

सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील हा भिवतास धबधबा अतिशय सुरेख आणि सुंदर आहे. उंचावरून पडणारे पांढरेशुभ्र पाणी अतिशय मनमोहक दिसत असते धबधब्याच्या खालचा परिसरही अतिशय सुंदर आहे.तेथिल परेटी डोह, हंडाहंडी डोह अतिशय सुंदर आहेत व दोन्ही बाजुचा परिसर अतिशय नयनरम्य आहे.

“परंतु या आदिवासी भागातील धबधब्याचे दुर्दैव असे की या परिसराचा कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही, दरवर्षी या धबधब्याचे पाणी कुठल्याही कामावीणा वाहुन जात असते. जर प्रशासन आणि लोकप्रतीनिधी यांनी या अप्रतिम निर्सगाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर सदर परिसर सुजलाम सुफलाम होऊन एक सुंदर असे पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरीकांना रोजगार निर्मिती होईल, अशी मागणी नागरीकांन कडून होत आहे.

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय