Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणनारायणगाव : मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश ! ८ लाख ७० हजार...

नारायणगाव : मोटारसायकल चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश ! ८ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

तिघांकडून ८ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या २० दुचाकी जप्त !

नारायणगाव पोलिस ठाणे आणि लोकल क्राईम ब्रँचची धडाकेबाज कामगिरी !

जुन्नर (पुणे) : नारायणगाव (दि.९ जुलै ) पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांनी पोलिसांपुढे एक आवाहन उभे ठाकले असतांना पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी मोटारसायकल चोरट्यांचा छडा लावण्याच्या सूचना नारायणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्याप्रमाणे पोलिसांनी कसून तपास करीत असतांना “रांजणी कारफाटा” येथे पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून ८लाख ७० हजार रुपयांच्या २० मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असल्याची माहिती नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या..यामुळे पोलिसांपूढे छडा लावण्याचे आवाहन तर नागरिकांमध्ये चोरट्यांनी एक प्रकारे दहशत निर्माण केली होती. त्यातल्या त्यात या घटना सातत्याने वाढत होत्या. 

नारायणगाव पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस तपास करीत असतांना या गुन्ह्यातील एक आरोपी किरण पिंपळे याचा सुगावा पोलिसांना लागला. गुप्त बातमीदारा मार्फत या मोहिमेवर असलेल्या पोलिसांना आरोपी किरण पिंपळे हा त्याचा साथीदार प्रवीण बाचकर याच्या सोबत चोरीच्या मोटारसायकली घेण्यासाठी आदित्य निकम याच्याकडे “रांजणी शिवारातील कारफाटा”येथे शुक्रवार( दि.९ जुलै )रोजी येणार आहे.अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर नारायणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिसांनी आरोपींना अटक करण्यासाठी साफळा लावला.

त्याच वेळेस एक इसम नंबरप्लेट नसलेल्या मोटारसायकलसह संशयितरित्या फिरतांना आढळला.थोड्याच वेळात दोन इसम मोटारसायकलवर तेथे पोहचले. त्यांना पोलिसांनी हटकावून ताब्यात घेतले असता त्यांनी त्यांचे नांवे किरण भास्कर पिंपळे (वय २५,रा.दरडगांव ता.राहुरी,जि अहमदनगर प्रवीण नामदेव बाचकर वय २८ रा.कानगर, ता.राहुरी,जि अहमदनगर व आदित्य दत्तू निकम वय १९ रा.खोडद,ता.जुन्नर,जि पुणे असे असल्याचे सांगितले.

यापैकी आदित्य निकम याच्याकडे चोरीच्या मोटारसायकल बाबत चौकशी केली असता,त्याने सांगितले की,त्याचा साथीदार रोहित गुंजाळ व अर्जुन पवार यांच्यासह मिळून पुणे,अहमदनगर जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणांवरून मोटारसायकली चोरी केल्या असून चोरलेल्या गाड्या आम्ही किरण पिंपळे प्रवीण बाचकर आणि कैलास येळे यांच्याकडे विक्रीस देत होतो.

चोरलेल्या मोटारसायकली पैकी काही मोटारसायकली आदित्य निकम याच्या घराजवळ लावल्या असून काही मोटारसायकली किरण पिंपळे, प्रवीण बाचकर व कैलास येळे याच्याकडे आहेत.अशी माहिती दिली.या माहितीवरून वरील ठिकाणी जाऊन एकूण ८ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या विविध कंपनीच्या एकूण २० मोटारसायकली ताब्यात घेतल्या असून पुढीलप्रमाणे पोलिस ठाण्यात मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

खेड पोलिस ठाणे गुन्हा र.नं.३३२/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९ आणि गु.र.नं. रजि.नं.३६२/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये ,पारनेर पो.ठाणे,गुन्हा.र.नं.१६७/२०२१भादवी कलम ३७९ अन्वये,शिरूर पोलिस ठाणे गुन्हा.र.नं.४७२/२०२० व १४५/२०२१ त्याचप्रमाणे ५२९/२०२१,४०८/ २०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये आळेफाटा पोलिस ठाणे गु.र.नं.२२३/२०२१, यवत पोलिस ठाणे गु.र.नं.८६८/२०२० ओतूर पोलिस ठाणे ६५/२०२१ भारतीय दंड विधान कलम ३७९ अन्वये गुन्हे दाखल आहेत. यातील आरोपी किरण भास्कर पिंपळे हा फरार असून, या आरोपींवर नारायणगाव पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. गु.र.नं.१०७/२०२१ व १२१/२०२१ अन्वये ३७९ कलमान्वये गुन्हा दाखल आहेत.या आरोपींकडून ८ लाख ७० हजार रुपयांच्या २० मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत. आरोपींची वैद्यकीय तपासणी करून,नारायणगाव पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहेत.

ही कारवाई पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी जुन्नर विभागाचे मंदार जवळे यांचे सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नेताजी गंधार, नारायणगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पो.ह.हनुमंत पासलकर, पो.ह.विक्रम तापकिर, पो.ह.दीपक साबळे, पो.ह.सचिन गायकवाड पो.ना.संदीप वारे, पो.शी.अक्षय नवले, निलेश सुपेकर, पो.ह.मुकुंद कदम, दगडू विरकर, नारायणगाव पो.ठाणे दिनेश साबळे व सचिन कोबल यांनी केली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय