ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने तहसिलदारांना निवेदन !
नारायणगाव (जुन्नर) : नारायणगावातील व्यापारी असोसिएशन व व्यापारी बांधवांनी सध्या चालू असलेल्या लॉकडाऊन संदर्भात नारायणगावचे सरपंच बाबूभाऊ पाटे यांची भेट घेतली, व अत्यावश्यक सेवा व सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत चालू करण्याचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला दिले असल्या कारणाने चालू ठेवण्याची मागणी केेली.
यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष किशोर पोखरणा, जितेंद्र गुंजाळ, कीर्ती भन्साळी, आशिषभाऊ माळवदकर, दीपक वारुळे, हर्षल मुथ्था, विशाल अडसरे हे होते.
त्यांनंतर नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, ग्रामपंचायत सदस्य अरीफभाई आतार, राजेश भैय्या बाप्ते, एजाजभाई चौधरी यांंनी निवेदनाद्वारे सर्व दुकाने सकाळी ७ ते २ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची मागणी तहसीलदार हनुमंत कोळेकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
ज्या गावामध्ये कोविड रुग्ण संख्या १०% पेक्षा जास्त आहे तेथील गावातील कोरोना संदर्भात सर्व आदेश हे कोरोना वरिष्ठ अधिकारी समिती यांचे राहील. परंतु ज्या गावामध्ये कोविड रुग्ण संख्या दर १०% पेक्षा कमी आहे तेथील कोरोना उपाययोजना संदर्भात सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाचे असतील असे नमूद केलेलं आहे.
मौजे नारायणगाव ता.जुन्नर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वारूळवाडी यांचे रिपोर्ट नुसार दि.२८ एप्रिल २०२१ ते ३० मे २०२१ चे रुग्ण संख्या हि ३७ पैकी बाधित ०२ आहे. म्हणजेच कोविड रुग्ण सांख्याची टक्केवारी हि १०% पेक्षा कमी आहे. तरी वरिष्ठ कार्यालयाचे आदेशांनुसार मौजे नारायणगाव ता.जुन्नर येथील गावचे कोरोना संदर्भात उपाययोजनेचे निर्णय ग्रामपंचायत नारायणगाव, आरोग्य विभाग व पोलीस प्रशासन विभाग यांस पारित होऊन मौजे नारायणगाव येथील सर्व दुकाने स.७.०० ते दु.२.०० पर्यंत चालू राहण्याचे निर्णय व्हावा, हे निवेदन ग्रामपंचायत नारायणगावच्या वतीने देण्यात आले आहे.