Sunday, December 8, 2024
Homeग्रामीणनारायणगाव : आशाताई बुचके यांच्या जिल्हा परिषद निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन...

नारायणगाव : आशाताई बुचके यांच्या जिल्हा परिषद निधीतून होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

नारायणगाव (जुन्नर) : नारायणगाव वार्ड नंबर ६ मध्ये जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांच्या निधीमधून रुपये ५ लक्ष सावतामाळी मंदिर ते नारायणवाडी चौक रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

तसेच पाटे खैरे मळा येथील बायपास ते धावडे मळा रस्ता मुरुमीकरण रुपये १ लक्ष ५० हजार तसेच वार्ड नंबर ५ मध्ये कोल्हे मळा येथे मनरेगा अंतर्गत शोषखड्डा घेणे याची सुरुवात झाली.

मोठं मोठे प्रकल्प मार्गी लागत असताना गावात अनेक छोटी छोटी कामे पार पडत आहे. गावाचा विकास योग्य दिशेने चालला आहे असे प्रतिपादन आशाताई बुचके यांनी यावेळी केले.

यावेळी नारायणगाव परिसरात मनरेगा मार्फत शोषखड्डे घेण्याचा नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या मार्फत कुटुंबाला, एकत्रित वस्तीला एक खड्डा घेण्यासाठी ग्रामपंचायत मनरेगा अंतर्गत ३७०० रुपयज देण्यात येणार आहे. 

भविष्यात नारायणगावातील जमिनीतील पाण्याची पातळी वाढावी या उद्देशाने सर्वांनी शोषखड्डे करावे असे आवाहन सरपंच बाबुभाऊ पाटे यांनी जनतेला केले. यावेळी “मनरेगाचे पाणी” या विषयावर काम करणारे कदम, जलजीवन मिशनचे श्रीमती देव उपस्थित होत्या.

या भूमीपूजनाला आशाताई बुचके,

विघ्नहर सहकारी साखर कारखाना संचालक संतोष खैरे, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, पंचायत समितीचे होडगे भाऊसाहेब, उपसरपंच पुष्पा आहेर, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकडे, स्थानिक सदस्य गणेश पाटे, मनिषा मेहेत्रे, संगीता खैरे, कुसुम शीरसाठ, आशिष माळवदकर, आरिफ आतार, संतोष दांगट, राजेश बाप्ते, किरण ताजने, भाग्येश्वर डेरे, सुदीप कसाबे, अनिल खैरे, हेमंत कोल्हे, नंदू अडसरे, अजीत वाजगे, विकास तोडकरी, सोपान खैरे, माजी सरपंच अशोक पाटे, संचित कोल्हे, जितेंद्र भोर, जालु खैरे, शंकर कोल्हे, सुनील पाटे, राजाराम पाटे, प्रल्हाद पाटे, प्रकाश पाटे, वसंत मेहेत्रे, समीर मेहेत्रे, बबन पाटे, पाटे खैरे मळा व कोल्हे मळा येथील स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


संबंधित लेख

लोकप्रिय