Saturday, December 7, 2024
Homeराजकारण‘’नारायण राणे पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती कोसळली’’

‘’नारायण राणे पांढऱ्या पायाचे, ते मंत्री झाल्यानेच कोकणावर आपत्ती कोसळली’’

जळगाव : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला, पश्चिम महाराष्ट्रासह कोकणांत झालेल्या अतिमुसळधार पावसानं होत्याचं नव्हतं केलं. पूरपरिस्थितीतून राज्य सावरण्याचा प्रयत्न करत असताना आता राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. राज्‍यावर आलेल्‍या संकटाबाबत नारायण राणे यांनी मुख्‍यमंत्री हे पांढऱ्या पायाचे असल्‍याने राज्‍यावर संकट आल्‍याचे वक्‍तव्‍य केले होते. यावर शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

राज्‍याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्‍यावर निशाणा साधला आहे. मंत्री पाटील म्‍हणाले, नारायण राणे केंद्रात मंत्री झाल्यानंतर कोकणावर संकट कोसळलं, नारायण राणे पांढऱ्या पायाचे असल्यामुळेच हे संकट आलं. अशी टीका केंद्रीय मंत्री राणे यांच्यावर केली.

तसेच, राज्‍यावर आलेल्‍या संकटावर राजकारण करू नये. आलेल्‍या संकटात व्‍यक्‍ती म्‍हणून सर्वतोपरी मदत करायला हवी. राजकारण करायला खुप आखाडे आहेत. जेव्‍हा वेळ असते तेव्‍हा तुमचा झेंडा घेवून तुम्‍ही उतरा आमचा झेंडा घेवून आम्‍ही आखाड्यात उतरू. मात्र राज्‍य संकटात असताना राजकारण करणे योग्‍य नसल्‍याचे मत देखील त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

संबंधित लेख

लोकप्रिय