Naneghat (शिवाजी लोखंडे) : जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील घाटघर येथील विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी शिवदुर्ग ट्रेकर्सच्या वतीने ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घाटघर आणि अजितदादा पवार हायस्कूल घाटघर या शाळांमधील एकूण १५० विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिवदुर्ग ट्रेकर्सच्या वतीने १५० विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. शिवदुर्ग ट्रेकर्सच्या गणपत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत ब्लॅंकेट वाटपाचा कार्यक्रम पार पडला. थंडीत या विद्यार्थ्यांना उबदारतेचा आधार देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. (Naneghat)
या कार्यक्रमाला अजितदादा पवार हायस्कूलचे मुख्याध्यापक सत्यवान जाधव, लिपीक शिंगाडे धोंडू, सहशिक्षक सोमनाथ महापूरे, बाळू पानसरे, तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब शिंदे आणि प्रशांत लोखंडे उपस्थित होते. या मान्यवरांनी शिवदुर्ग ट्रेकर्सच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांसाठी केलेल्या या मदतीबद्दल आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ निलेश रावते, विष्णू शिंदे, धर्मा आढारी यांच्यासह अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी देखील या सामाजिक उपक्रमासाठी शिवदुर्ग ट्रेकर्सचे आभार मानले. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना थंडीच्या कठीण प्रसंगी या छोट्याशा मदतीने त्यांना दिलासा मिळाला आहे.
(Naneghat)
हे ही वाचा :
लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार ? महत्त्वाची माहिती समोर
आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांसाठी भरती
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? शपथविधीची जोरदार तयारी
गिनी मध्ये फुटबॉल मैदानावर दंगल, 100 ठार
डोनाल्ड ट्रम्प यांची ब्रिक्स देशांना धमकी, डॉलर बदलण्याचा विचार सोडा…
NFR : पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे अंतर्गत 5647 जागांसाठी भरती
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 690 जागांसाठी भरती