Friday, March 29, 2024
Homeग्रामीणनंदुरबार : तळोदा तहसीलदार कचेरीसमोर विविध संघटनांचे धरणे आंदोलन

नंदुरबार : तळोदा तहसीलदार कचेरीसमोर विविध संघटनांचे धरणे आंदोलन

नंदुरबार : आज दि. २६ जून २०२१ रोजी संयुक्त किसान मोर्चा व किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सर्व देशभर धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली. त्या हाकेनूसार नंदुरबार जिल्हयात तळोदा तहसिल कचेरी समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

शेतकरी विरोध काळे कायदे रद्द करा, सुधारित विज विधयेक रद्द करा, शेतमालाला हमीभाव देणार कायदा करा, आदी मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी किसान सभेचे जेष्ठ नेते कॉ. जयसिंग माळी, कॉ  शामसिंग पाडवी, शेतमजूर युनियनचे कॉ। अनिल ठाकरे, डीवायएफआय चे कॉ. दयानंद चव्हाण, डीवायएफआयचे जिल्हा सचिव कॉ. सुदाम ठाकरे तसेच कॉ. तापीबाई माळी, कॉ. सुपडीबाई पाडवी, कॉ. सकूबाई वळवी, कॉ. सुभाष ठाकरे, कॉ. भगवान कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.


संबंधित लेख

 


- Advertisment -

लोकप्रिय