मुक्रमाबाद (मुखेड) : मुखेड तालुक्यातील नरसिंंग महाराज प्राथमिक शाळा गोजेगाव येथील सहशिक्षक दिलीपकुमार पंढरीनाथ सुगावे यांना महात्मा ज्योतीराव फुले शिक्षक परिषदेतर्फे शिर्डी येथे महात्मा फुले शिक्षक परिषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव वडजे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बिग्रेडीयर सुधीर सावंत, आ. सुधीर तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल छावा युवा संघटनेचे अध्यक्ष गिरीधर शिंदे करुरकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष वैभव राजुरकर, सुर्याजी शिंदे, नितिन कौशले यांनी अभिनंदन केले.