(मुखेड/प्रतिनिधी) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर मंगळवारी संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आल्याची माहिती कळताच आंबेडकरी अनुयायांकडून निषेध व्यक्त करण्यात आले. मुखेडात राहूल लोहबंदे मित्रमंडळ, भारतीय बौद्ध महासभा, शेतकरी कामगार पक्ष, ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देऊन दोषींवर कारवाईची मागणी करण्यात आली.
राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. राजगृह ही इमारत नसून कोट्यावधी बहुजनांची अस्मिता असल्याचे मत माजी नगरसेवक राहूल लोहबंदे यांनी व्यक्त केले. संबंधित आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार काशिनाथ पाटील यांना करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान “राजगृहावर” झालेल्या भ्याड हल्ल्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या मुखेड तालुका समिती तीव्र निषेध व्यक्त करते. हल्लेखोरांना तात्काळ अटक करा आणि हल्ल्यामागील सुत्रधारांना जेरबंद करा.
विनोद गोविंदवार, तालुका सचिव
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
यावेळी माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, सुरेंद्र भद्रे, शेख मुख्तार बेळीकर, अनिकेत कांबळे, अजय कांबळे, रितेश कांबळे, अशितोष कांबळे आदीसह. भारतीय बौद्ध महासभा शाखा मुखेडचे अध्यक्ष गंगाधर सोंडारे, सचिव दिपक लोहबंदे, बाबुराव घोडके, राहूल कांबळे, उत्तम गवळे, अविनाश कांबळे, गुंडेराव गायकवाड, शेतकरी कामगार पक्षाचे शहराध्यक्ष असद बल्की, ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफचे जिल्हा प्रभारी शेख रियाज, बबलु मुल्ला आदी उपस्थित होते.