Thursday, January 23, 2025

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांच्या संपाला नागपूरात सकारात्मक प्रतिसाद, विविध ठिकाणी निदर्शने !

नागपूर : आशा व गटप्रवर्तक संघटनांनी आज (दि.२४) देशव्यापी बंदाची हाक दिली होती. नागपूर जिल्ह्यात आणि शहरातही या बंदाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तसेच काही ठिकाणी आशा व गटप्रवर्तकांनी निदर्शने देखील केली.

आशा व गट प्रवर्तक यांना कोरोना काळात नियमित कर्मचाऱ्या प्रमाणे राबविले जात आहे. परंतू त्यांना योग्य मोबदला दिला जात नाही. उलट त्यांना अधिकारी काढून टाकण्याची धमकी देतात तर सर्वेक्षणाला गेल्यावर अनेकदा त्यांच्या वर हल्लेही झाले आहेत. कोविड काळात सक्षम व समर्थपणे सेवा देणाऱ्या या आघाडीच्या कामगारांना कोविड योध्दा म्हणून गौरविण्यात आले, ही अभिमानाची बाब असली तरी त्यांना गरजेपुरता मोबदला दिला जात नाही. अशा भयंकर महामारीत काम करताना कांहीनां प्राण गमवावे लागले, असे अनेक समस्या आशा व गटप्रवर्तकांच्या आहेत. तसेच आशा व गट प्रवर्तकानां शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान २२ हजार रुपये वेतन द्यावे या प्रमुख मागण्या होत्या.

नागपूर जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तकांंनी या लाक्षणिक संपात स्वयंस्फूर्तीने सक्रीय सहभाग नोंदवावा. या संपाचे नेतृत्व राजेंद्र साठे, प्रीती मेश्राम, रंजना पौनिकर, नंदा लीखार, मंगला बागडे, लक्ष्मी कोतेजवार, रुपलता बोंबले, पौर्णिमा पाटील, उषा ठाकूर, उज्वला कांबळे, माया कावळे, शुभांगी चीचमलकर, विजेता नितनवरे, कल्पना हटवार, निता भांडारकर, सारिका जावळे, अंजु चोपडे, विशाखा चौधरी, कल्पना राऊत, अर्चना ठाकरे, मंदा जाधव, वंदना बहादूरे, सरिता ठवरे, हेमलता हातीठेले, रेखा पानतावणे, सारिका लांजेवार, सपना गणवीर, संगीता मेश्राम, सोनाली धांडे यांच्यासह आशा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.


Related Articles

- Advertisement -

Latest Articles