Saturday, December 7, 2024
Homeजिल्हानागपूर : आशा व गटप्रवर्तकांचे देशव्यापी मागणी दिवस, "या" आहेत मागण्या

नागपूर : आशा व गटप्रवर्तकांचे देशव्यापी मागणी दिवस, “या” आहेत मागण्या

नागपूर : आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सी. आय. टी. यू.) तर्फे १० मे रोजी राष्ट्रीय पातळीवर “मागणी दिन” पाळण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी दिली.

साठे म्हणाले की, कामाचे जागी, तसेच आरोग्य केंद्रासमोर काळे वस्त्र धारण करून, काळया फिती लावून, हातात मागण्याचे फलक घेऊन हे आंदोलन करण्यात येणार आहे.

तसेच केंद्रीय कमीटीच्या निर्देशानुसार १० तारखेला आंदोलन करायचे आहे. खालील मागण्या मान्य न झाल्यास २४ मे रोजी देशव्यापी १ दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

आशा व गटप्रवर्तकांच्या पुढीलप्रमाणे :

१. आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी कर्मचारी घोषित करा.

२. सर्व आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागू करा.    

३. कोरोना काम करणाऱ्या सर्वांना ३०० रूपये रोज द्या.             

४. सर्वांना सुरक्षा साहित्य उपलब्ध करून द्या.

५. सर्वांना १० लाख रुपये आजीवन वीमा लागू करा.

६. सर्व आशा व गटप्रवर्तक यांना ५ हजार रुपये पेन्शन लागू करा.         

७. सर्वांना रिटायरमेंट नंतर ५ लाख रुपये मोबदला द्या.               

८. कामगार विरोधी चारही नवीन कामगार कायदे रद्द करा.         

९. सरकारी संपत्ती अडाणी – अंबानी याना विकून खाजगीकरण बंद करा.

संबंधित लेख

लोकप्रिय