कोल्हापूर : वाचलेली पुस्तके आणि भेटलेली माणसं व्यक्तिमत्व घडवतात. मला वाचनाची सवय असून माझे स्वतःचे ग्रंथालय असून त्यात पाच हजार पुस्तके आहेत. विश्वास सुतार यांच्या नाळ पुस्तकांमध्ये महाराष्ट्रातील शिक्षकांच्या संवेदनशील अनुभवांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. या उपक्रमामुळे इंटरनेटच्या युगात लोप पावत चाललेल्या वाचन संस्कृतीला उभारी मिळणार आहे. नेटवरील पुस्तकापेक्षा जिवंत पुस्तके वाचणे अधिक प्रभावी वाटते. नाळ या पुस्तकात शिक्षकांनी आपल्या संवेदना आणि ऊर्जा शब्दबद्ध केल्या असल्यामुळे यातील कथा वाचताना रोमांच उभा राहातो, नाळ हा कथासंग्रह मानवी समाज समृद्ध करणारा कथासंग्रह असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्र सतेज पाटील यांनी समाजभान समूह आणि निर्मिती विचारमंच, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निर्मिती प्रकाशन प्रकाशित लेखक विश्वास सुतार संपादित नाळ कथासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी केले.
कार्यक्रमाची सुरुवात वैष्णव जन तो… या गीताने झाली. कैवल्य पाटील याने सुरेल आवाजात गीत गाऊन सुरुवात केली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रकाशक अनिल म्हमाने यांनी केले. ज्येष्ठ कथाकार आप्पासाहेब खोत म्हणाले, जातिवंत शिक्षकांनी विद्यार्थी समाज आणि शाळेशी नाळ जोडली तरच उद्याचा भारत देशाचे भवितव्य उज्वल होईल. शिक्षकांनी आपला शिकवण्याचा धर्म कधीही विसरता कामा नये. माणसाच्या जगण्यात चांगल्या पुस्तकांचं स्थान अत्यंत महत्त्वाच आहे.
सगळीकडे माणसांचा आणि माणुसकीचा दुष्काळ असताना मातीशी नात सांगणाऱ्या माणसांची समाजाला गरज आहे. समाजाशी नाळ घटक असणारा घटक म्हणजे शिक्षक व अशा शिक्षकांनी संवेदनशील लेखक केलं पाहिजे. शिक्षक दिशा देतात हे या कथांमधून सिद्ध झाले आहे. शिक्षकांनी आपले अनुभव व्यक्त करायला शिकले पाहिजे असे मत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ऍड. प्रकाश मोरे यांनी आपल्या भाषणात मांडले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी. पी. माळी म्हणाले, कोरोना काळात विश्वास सुतार यांनी महाराष्ट्रातील शिक्षकांनी लिहिलेल्या कथा पुस्तक रूपात प्रसिद्ध करून नवा इतिहास रचला आहे. त्यांचे कार्य महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेमध्ये पुस्तक रूपाने गेले पाहिजे.
यावेळी प्रा. किसनराव कुराडे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग हाऊसचे चेअरमन के. जी. पाटील, प्रभाकर हेरवाडे, सुरेश केसरकर यांची भाषणे झाली
सतेज पाटील यांच्या हस्ते महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त शिक्षक लेखकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी चंद्रकांत सावंत, राजाराम वरुटे, प्रसाद पाटील, सतीश बर्गे, मिलिंद यादव, शांतीलाल कांबळे, मंदार पाटील, बाजीराव कांबळे, लक्ष्मी पाटील, अशोक नायकवडे, गौतम वर्धन उपस्थित होते. सूत्रसंचालन संदीप मगदूम आणि श्रेया जोशी यांनी केले आभार हरिदास वर्णे यांनी मांडले.