Myanmar Earthquake : शुक्रवारी, 28 मार्च 2025 रोजी, म्यानमारमधील मंडले जवळ 7.7 तीव्रतेचा भूकंप आला, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला, मंडाले सह विविध शहरे आणि ग्रामीण भागात मोठा विध्वंस झाला आहे. आणि अनेकांचे प्राण गेले. या भूकंपानंतर 6.4 तीव्रतेचे आफ्टरशॉक आले, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली.
दूरसंचार, दळणवळण जनसंपर्क यंत्रणा ठप्प झाली असून अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वेमार्ग उध्वस्त झाले आहेत.
म्यानमारमधील मृतांची संख्या 1,000 च्या वर गेली आहे, तर 2,376 जण जखमी झाले आहेत. मंडले शहरात विशेषतः मोठा विध्वंस झाला असून, इमारती, पूल आणि रस्ते कोसळले आहेत. या आपत्तीमुळे म्यानमारच्या सैन्य सरकारने आणीबाणीची स्थिती जाहीर केली आहे आणि आंतरराष्ट्रीय मदतीची विनंती केली आहे. (हेही वाचा – ‘लापता लेडीज’साठी आमिर खानचा ऑडिशनचा व्हिडिओ व्हायरल, एकदा बघाच !)
Myanmar earthquake
थायलंडमधील बँकॉकमध्ये देखील भूकंपाचे तीव्र कंपन जाणवले, ज्यामुळे बांधकाम कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आणि 101 जण बेपत्ता आहेत. म्यानमारमधील सध्याच्या परिस्थितीमुळे मदतकार्यांमध्ये अडचणी येत आहेत. (हेही वाचा – कुणाल कामराच्या प्रकरणावर ध्रुव राठीने दिली प्रतिक्रिया, पैसेही पाठवले)
आंतरराष्ट्रीय समुदायाने मदतीचे हात पुढे केले आहेत. भारताने 15 टनांची मदत पाठवली आहे, तर संयुक्त राष्ट्रांनी 5 दशलक्ष डॉलरची मदत जाहीर केली आहे. म्यानमारमधील सध्याच्या परिस्थितीमुळे आणखी मदतीची आवश्यकता आहे. (हेही वाचा – गुढीपाडव्याच्या आधीच सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, वाचा आजचे दर)