मुठेवाडगाव (श्रीरामपूर) : आज (ता.१४) न्यू इंग्लिश स्कूल मुठेवाडगाव येथील मैदानात गावचे सरपंच सागर मुठे पाटील यांनी भारतीय सैन्य दलात भरतीचे स्वप्न उरात बाळगणाऱ्या तरुणांना सरावासाठी व्यायाम आणि तंदुरुस्तीसाठी काही साधने उपलब्ध करून देण्यात आले.
यामुळे अधिकाअधिक युवकांना प्रोत्साहन मिळेल ज्यातून भविष्यात गावातून पोलिस अधिकारी किंवा फौजी मेजर म्हणून उदयास येवू शकतात. यामुळे गावातील तरुणांमध्ये आनंदी, उत्साही वातावरण आहे.
गावातील तरुणांच्या अडचण लक्षात घेऊन गावचे सरपंच सागर मुठे पाटील यांनी गावच्या निधीची वाट न पाहता स्वखर्चाने तरतूद करुन सोडवली आणि निवडणूकी वेळी जो शब्द दिला होता तो खऱ्या अर्थाने सोडवला असे म्हणत तरुणांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी नितीन बोरुडे, नाना जाधव, बाळासाहेब भोंडगे, अनिल मुठे, शाम मुठे तसेच इतर ग्रामस्थ आणि तरुण उपस्थित होते.