Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

महानगरपलिकेने कंत्राटी कामगारांना सुध्दा दिवाळी बोनस द्यावा – डॉ.कैलास कदम

---Advertisement---

पिंपरी, (दि.२५) : पिंपरी चिंचवड शहरातील आठ प्रभाग मध्ये १६०० महिला आणि पुरुष कर्मचारी रस्ते सफाईचे काम करीत आहेत. सफाई कामगारांच्या बरोबर अन्यायकारक आणि भेदभावाची भूमिका महापालिकेनी घेतलेली दिसून येते.

---Advertisement---

कंत्राटी ठेकेदार पध्दतीचा अवलंब करुन साफसफाईचे काम करुन घेण्यासाठी हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत. परंतु त्यांना मिळणार कामाचा मोबदला हा त्यांचा कामाच्या स्वरुपा पेक्षा अत्यंत अल्प आणि कमी आहे तसेच कामाचा मोबदला कधी ही वेळेवर मिळाला नाही. कोणत्याही कामगार कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. करोना काळात निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना सणासुदीला वेळेवर बोनस देण्यासंदर्भात महापालिकेने कोणतीही  अधिकृत सुचना दिली नाही. 

“महानगरपालिकेतील घंटागाडी कर्मचारी यांना रू. ४० हजार दिवाळी बोनस स्थायी समितीने प्रस्ताव मंजूर केला, परंतु महानगरपालिकेने कंत्राटी कामगारांना बोनस पासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे हे अन्यायकारक आहे” असे कदम म्हणाले. 

याबाबत पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कंत्राटी कामगारांना हक्काचा बोनस मिळायला हवा म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या सोबत चर्चा झाली. शहरातील विविध भागातील कंत्राटी कामगारांना हक्काचा बोनस देण्यासंदर्भात महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या सोबत उद्या चर्चा करून भेटीची वेळ निश्चित करण्यात येणार आहे. या प्रसंगी युवक काँग्रेस शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माऊली मल्लशेट्टी, रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, ओमकार भोईर, ऋषिकेश कानवटे व महिला कामगार आदि उपस्थित होते. 

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles