Saturday, April 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडनदीत बेकायदेशीर भराव टाकल्या प्रकरणी कंपनीला महापालिकेची नोटीस

नदीत बेकायदेशीर भराव टाकल्या प्रकरणी कंपनीला महापालिकेची नोटीस

नदी प्रदूषणाबाबत “अपना वतन” संघटनेचा पाठपुरावा

पिंपरी चिंचवड
: काळेवाडी बीआरटी रोड येथील नदीपात्रात बेकायदेशीर भराव टाकल्याबाबत व मैलामिश्रीत सांडपाणी सोडून नदीमधील जीवसृष्टीस व पर्यावरणास हानी पोहचवल्याप्रकरणी मे.खिलारी इन्फ्रा. प्रा. लिमिटेड या कंपनीवर कारवाई करणेबाबत अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दिक शेख यांनी दि. २८/०७/२०२२ रोजी पिंपरी चिचंवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्याकडे तक्रार केली होती.

नदीत टाकलेल्या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच नदी मध्ये मैलामिश्रीत व रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे नदीमधील जीवांना धोका निर्माण होऊन ते नष्ठ होण्याचा धोका निर्माण होतो. असे प्रशासनच्या निदर्शनास आणून देंण्यात आले होते. सदर तक्रारीची दखल घेऊन पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी मे खिलारी इन्फ्रा.प्रा. लिमिटेड याना खुलासा करणेबाबत नोटीस काढलेली आहे.

तसेच नदीपात्रातील अनधिकृत बंधकांबाबत ग प्रभाग कार्यालयास कळविले आहे. मे खिलारी इन्फ्रा. प्रा.लिमिटेड याना दिलेल्या नोटीसमध्ये असे नमूद केले आहे कि, पावसाळ्यापूर्वी नदीतील भराव काढून टाकण्याच्या सूचना वारंवार केल्या होत्या तरी आपण कोणतीही कार्यवाही केलेली नाही. सदरची बाब हि अतिशय गंभीर असून आपल्यावर निविदा अटी व शर्तीनुसार कारवाई का करण्यात येऊ नये याचा खुलासा ४ दिवसात करण्यात यावा. सदरचा खुलासा वेळेत सादर न केल्यास किंवा दिलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास आपल्यावर निविदा अटी व शर्ती नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच सदरचा भराव काढणेबाबत आपल्याकडून कार्यवाही करण्यात यावी व कामाचा अहवाल या विभागास सादर करण्यात यावा, अशा प्रकारची नोटीस देण्यात आलेली आहे.

– क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय