Monday, February 3, 2025

Mumbai : सड़क सुरक्षा अभियान 2025: रस्ता सुरक्षा आणि युवा जनजागृतीवर लक्ष केंद्रित करणारा उपक्रम..

मुंबई (वर्षा चव्हाण) – रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH), मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात, ‘सड़क सुरक्षा अभियान 2025’ च्या तिसऱ्या आवृत्तीचे आयोजन करीत आहे, जे भारतातील रस्ता सुरक्षेचे जनजागृतीसाठी समर्पित असलेला एक प्रभावी सार्वजनिक सेवा अभियान आहे. (Mumbai)

न्यूज 18 ने सलग तिसऱ्या वर्षी सड़क सुरक्षा अभियान 2025 इव्हेंटचे आयोजन केले आहे.या उपक्रमात 25 जानेवारी 2025 रोजी मुंबईमध्ये 4 तासांचा टेलिथॉन कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचा उद्देश जबाबदार रस्ता वर्तनाला प्रेरणा देणे, रस्ता अपघात कमी करणे आणि सुरक्षित ड्रायव्हिंग पद्धतींना प्रोत्साहन देणे आहे. या अभियानाची प्रभावीता वाढवण्यासाठी नितीन गडकरी आणि अमिताभ बच्चन हे नेत्याची भूमिका बजावली

सड़क सुरक्षा अभियान 2025 हे भारताच्या भविष्यकालीन पिढी असलेल्या मुलांना आणि तरुणांना मुख्य रस्ता सुरक्षा दूत म्हणून तयार करण्यावर लक्ष केंद्रित करते.

MoRTH च्या अधिकृत अहवालांनुसार, देशात दर तासाला 55 रस्ता अपघात आणि 20 मृत्यू घडले. 2023 मध्ये 4.80 लाख रस्ता अपघात घडले, ज्यामुळे 1.72 लाखाहून अधिक माणसांचा मृत्यू झाला. या चिंताजनक आकड्यांमुळे रस्ता सुरक्षेच्या क्षेत्रात पाऊले टाकण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

रस्ता सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी आहे, ज्यासाठी सर्वांना एकत्र येणे आवश्यक आहे. ‘सड़क सुरक्षा अभियान’ फक्त एक अभियान नाही; हे एक चळवळ आहे, जी प्रत्येक भारतीयाला सुरक्षित रस्त्यांसाठी आपला भाग निभावण्याची प्रेरणा देते. (Mumbai)

युवक पिढीच्या नेतृत्वाखाली, ‘सड़क सुरक्षा अभियान’ एक सुरक्षित भविष्य निर्माण करण्यासाठी एक महत्त्वाचा पाऊल आहे. जनजागृती, शिक्षण आणि सामूहिक प्रयत्नांद्वारे, आपण रस्ता अपघात मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो आणि जीव वाचवू शकतो.

सड़क सुरक्षा अभियान 2025 विशेषत: मुलं आणि तरुणांना रस्ता सुरक्षा दूत म्हणून तयार करत आहे, ज्यामुळे भारतात अधिक सुरक्षित रस्त्यांचे वातावरण तयार होईल. हे अभियान त्याच्या चार स्तंभांच्या माध्यमातून मुख्य संदेश पुनःपुन्हा समोर आणते: परवाह (काळजी), पहेल (पाऊल), प्रयास (प्रयत्न) आणि परिवर्तन (बदल) असे अभियानाचे चार प्रमुख स्तंभ आहेत.

या वर्षाच्या अभियानाचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे टेलिथॉन, ज्यामध्ये अनेक प्रमुख सेलिब्रिटी आणि तज्ञ सहभागी झाले. कार्यक्रमात नितीन गडकरी, बॉलिवूड दिग्गज अमिताभ बच्चन, लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमार ,पंकज त्रिपाठी, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू, विक्रांत मसे, उद्योजिका आणि कार्यकर्त्या नव्या नवेली नंदा आणि केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांचा समावेश होता.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles