Friday, June 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mumbai : असंघटित कामगारांच्या प्रश्नावर लवकरच बैठक – कामगार मंत्री आकाश फुंडकर

कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मंत्रालयात घेतली कामगार मंत्र्यांची भेट (Mumbai)

मुंबई – महाराष्ट्रातील असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने आज मुंबई मंत्रालयात राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. या भेटीत असंघटित क्षेत्रातील कामगारांचे विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वेतनवाढ, अपघातानंतरची भरपाई तसेच नोंदणी व पोर्टल व्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली (Mumbai)

कष्टकरी संघर्ष महासंघाचे प्रमुख कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी ही भेट घेतली असून त्यांच्यासोबत प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, निमंत्रक भास्कर राठोड, मनोज पाटील आणि महादेव गायकवाड यांची उपस्थिती होती.

या बैठकीत विविध महत्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या. त्यात घरेलू कामगार मंडळासाठी निधी उपलब्ध करणे, रिक्षाचालकांसाठी अपघाती विमा संरक्षण योजना सुरू करणे, कंत्राटी व असंघटित कामगारांना गृहसुविधा योजना लागू करणे, बांधकाम कामगारांची पडताळणी संख्या प्रतिदिन ५० वरून २०० पर्यंत वाढवणे तसेच कामगार लाभाची मंजुरी जलद गतीने पूर्ण करणे, अशा मुद्द्यांचा समावेश होता. (Mumbai)

विशेषतः, कामगार नोंदणीसाठी एकात्मिक पोर्टल सुरू करणे, ही कामाची प्राथमिकता असल्याचे शिष्टमंडळाने अधोरेखित केले. सध्या असंघटित कामगारांना त्यांच्या हक्कासाठी विविध खात्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात. या समस्येवर उपाय म्हणून एकसंध ऑनलाइन प्रणालीची अंमलबजावणी करण्याची मागणी झाली.

मंत्री आकाश फुंडकर यांनी सर्व मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या आणि लवकरच असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र बैठक घेऊन त्यावर घेऊ असे आश्वासन दिले. (Mumbai)

कष्टकरी संघर्ष महासंघाकडून यापूर्वीही या संदर्भात विविध निवेदने सादर करण्यात आली होती. मात्र या बैठकीत कामगार मंत्री आणि महासंघ यांच्यात थेट संवाद झाल्यामुळे असंघटित कामगारांच्या प्रश्‍नांवर ठोस निर्णयांची अपेक्षा व्यक्त होत आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles