मुंबई : महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण प्रभादेवी येथील पु. ल.देशपांडे अकादमी येथे आयोजित सोहळ्यात करण्यात आले. यंदाचा कवी नर्मद मराठी साहित्य पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांना प्रदान करण्यात आला. तर कवी नर्मद गुजराती साहित्य पुरस्कार ईश्वरलाल परमार यांना प्रदान करण्यात आला. (Mumbai)
गुजराती साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष स्नेहल मुजुमदार, सहसंचालक सचिन निंबाळकर यांच्यासह अकादमीच्या सदस्यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इतर पुरस्कार :- जीवन गौरव पुरस्कार साहित्य – तरिणीबहेन देसाई, जीवन गौरव पुरस्कार कला – ललिता पटेल, जीवन गौरव पुरस्कार पत्रकारिता – अक्षय अंताणी, जीवन गौरव पुरस्कार संस्था – जन्मभूमी, सौराष्ट्र. (Mumbai)
चूनीलाल मीडिया द्वितीय पुरस्कार निरंजन मेहता यांच्या ‘अतिथी देवो भव’ या पुस्तकास मिळाला. हरिश्चंद्र भट्ट काव्य पुरस्कार प्रथम -उदयन ठक्कर यांच्या रावनहाथ्थो यास तर द्वितीय- पुरस्कार प्रदीप संघवी यांच्या ‘कारवी’ या काव्यास मिळाला. ललित निबंध विभागात नीला संघवी यांच्या नवा जमानानी नवा वातो या निबंधास प्रथम पुरस्कार देण्यात आला. यशवंत जोशी नवोदित लेखक पुरस्कार प्रथम – मिता मेवाड यांच्या ‘झाकल भिनी वातो’ या पुस्तकास तर द्वितीय – ममता पटेल यांच्या ‘आत्ममंथन’ या पुस्तकास देण्यात आला. अनुवादीत पुस्तकांसाठीचा गोपाळराव विद्ववांस पुरस्कार वैशाली त्रिवेदी यांना प्रदान करण्यात आला.
हेही वाचा :
मी महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो – अजित पवार
मोठी बातमी : ‘म्हाडा’च्या ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात
शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती
मोठी बातमी : राजकोट किल्ल्यावर मोठा राडा, शिवरायांच्या पुतळ्या राजकारण तापले
“घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन” नारायण राणे यांची जीवे मारण्याची धमकी
Telegram : टेलिग्रामवर भारतात बंदी येणार ? वाचा काय आहे प्रकरण !
शासकीय, निमशासकीय विभागात हजारो विविध पदांसाठी भरती, वाचा एका क्लिकवर !
खूशखबर ; भारतीय रेल्वेमध्ये 14,298 टेक्निशियन पदांसाठी मोठी भरती होणार
बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये 1846 पदांची मेगा भरती, आजच अर्ज करा
कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती