Friday, April 11, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Mumbai : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

Mumbai, दि. २९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतर्वासिता (इंटर्नशिप) करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुकांना दि. १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे.

---Advertisement---

महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे.

आंतर्वासिता कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही. विद्यार्थ्यांच्या पात्रता/कौशल्यानुसार त्यांना मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी विविध शाखांमध्ये काम दिले जाईल. कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल तथापि, संबंधित शाखांच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेतला जाईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणला जाईल. यशस्वीरित्या आंतरवासिता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

---Advertisement---

इथे करा अर्ज Mumbai

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी महसंचालनालयाच्या महासंवाद या पोर्टलवर पुढील लिंकवर https://mahasamvad.in/?p=127837 जाहिरात पहावी.

whatsapp link
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
google news gif

हेही वाचा :

संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले

धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या

पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त

अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल

जितेंद्र आव्हाड आज महाड येथे करणार मनुस्मृतीचे दहन, वाचा काय आहे प्रकरण !

ब्रेकिंग : पालघरमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; डझनभर गाड्या रद्द, रेल्वेकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

मोठी बातमी : बाबा गुरमीत राम रहीमची हत्याकांड प्रकरणातून निर्दोष मुक्तता

ब्रेकिंग : अजित पवार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात होणार चौकशी

लोकसभेच्या निकाला अगोदरच राज ठाकरेंनी भाजपाला दिला मोठा धक्का

---Advertisement---

मोठी बातमी : ICICI आणि YES बँकेवर भारतीय रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई

माझ्या भुकेल्या पोटासाठी मी नोकरीच्या शोधात, उर्फी जावेदची पोस्ट व्हायरल !

ब्रेकिंग : लोकसभेत काय होईल ब्रम्हदेवही सांगू शकत नाही अजित पवार यांचे मोठे विधान

NDA : एनडीए प्रवेशासाठी सीईटी; अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी!

छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्रात प्रवेशासाठी मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles