मुंबई / वर्षा चव्हाण – महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी ‘लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेला राज्यातील महिलांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
मात्र निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडक्या बहीणींच्या हप्त्यात वाढ करत 2100 रुपये देणार असं म्हटलं होतं. परंतु, आता महायुती आपला शब्द पाळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Mumbai)
शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येतील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. (Mumbai)
दरम्यान, आता डिसेंबरमधील हप्ता कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे. तर पुढील महिन्यामध्ये महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळणार आहेत.