Tuesday, May 20, 2025
---Advertisement---
---Advertisement---

विशेष : करोनाच्या दुसऱ्या लाटेत विरघळत गेलेला चिखल-माती-वाळूचा पुतळा – डॉ.संजय दाभाडे

---Advertisement---

---Advertisement---

करोनाचा दुसरा संभाव्य उद्रेक लक्षात घेऊन केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित ‘संसदीय समिती’ ने नोव्हेंबर २०२० मध्ये सादर केलेल्या अहवालात ३ महत्वाच्या सूचना मोदी सरकारला दिल्या होत्या.

१. प्राणवायू चे उत्पादन ताबडतोब वाढविण्यात यावे व त्यावर काटेकोरपणे लक्ष केंद्र सरकारने ठेवावे.

२. सध्या दर एक हज्जार रुग्णांमागे फ़क्त ०.५५ बेड्स आहेत. बेड्स ची संख्या वाढविण्यात यावी.

३. २०२१ – २२ च्या अर्थसंकल्पात जिडीपीच्या अडीच टक्के तरतूद सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर करावी.

परंतु मोदी सरकारने याही शिफारशींकडे कानाडोळा केला व आताच्या २०२१ च्या अर्थसंकल्पात वरील शिफारशीच्या निम्मे म्हणजे जिडीपीच्या  फ़क्त १.३ टक्के तरतूद केली.

संसदीय समितीच्या शिफारशींवर केंद्र सरकारने कार्यवाही अहवाल ( ऍक्शन टेकन रिपोर्ट Action Taken Report ) सादर करणे आवश्यक असते .

परंतु अत्यंत गंभीर बाब म्हणजे करोनाची अत्यंत भयंकर पहिली लाट आपण अनुभवली असल्याची पार्श्वभूमी असतांनाही तथाकथित कार्यक्षम व गुड गव्हर्नन्स चा गवगवा करणाऱ्या मोदी सरकारने भारताच्या आरोग्य व्यवस्थेशी संबंधीत ह्या अत्यंत मौलिक अहवालावर असा ‘कार्यवाही अहवाल’ सादर करण्याची जागरूकता व कार्यक्षमता दाखविली नाही.

आरोग्य मंत्रालयाशी संबंधीत संसदीय समितीने करोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या ह्या शिफारशी थोर मोदी सरकारने बासनात गुंडाळून ठेवल्या व आज मोदी सरकारच्या ह्याच बेजबाबदारपणाचे व निष्क्रियतेचे भीषण परिणाम गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या असहाय्य्य  जनतेला भोगावे लागत आहेत.

हज्जारो लोक ‘प्राणवायू’ न मिळाल्याने तडफडून मरत आहेत.

दुसरीकडे ह्याच मोदींनी करोनाला वाढवणाऱ्या सुपर स्प्रेडर superspreder निवडणूक प्रचारात लाखोंच्या सभा घेतल्या व प्रचंड गर्दीचे कौतुक केलें नि ४० लाख लोकं सहभागीं झालेत त्या  कुंभ मेळा होऊ देण्यात कमालीची कार्यक्षमता दाखविली.

दुसरीकडे अनेक देश करोना लसींच्या उपलब्धतेसाठी वेळीच जागें होत लसी निर्मितीसाठी मोठी तरतूद करत असतांना मोदीजी मात्र लस – मैत्रीच्या बढाया मारत राहिले. आज भारतात लसीचा गंभीर तुटवडा होऊन लसीकरण केंद्रांना वेळोवेळी टाळे लावण्याची वेळ आली आहे. ह्या नियोजनशुन्यतेमुळे देशात पुढील काळात ‘हर्ड इम्युनिटी’ ( सामूहिक प्रतिकारशक्ती ) येण्यास उशीर होऊन करोनाच्या  आणखी काही लाटा धडकण्याचा धोका निर्माण झाला आहे.

---Advertisement---

कोणत्याही गोष्टीचे इव्हेन्ट करण्याची सवय लागलेल्या मोदींनी लसीकरणाचा ‘उत्सव’ साजरा करण्याचे सांगितले. परंतु वास्तवात अनेक लसीकरण केंद्रांना टाळे लागलें व लसी घेण्यास आलेल्या ज्येष्ठांचे – वृद्धांचे अतोनात हाल सुरु आहेत.

ह्यातून हें स्पष्ट आहे कि गुड गव्हर्नन्स, कार्यक्षम, खंबीर नेतृत्व ह्या ब्राम्हणशाही व भांडवलशाहीने प्रसिद्धी माध्यमांशी मिलीभगत करून उभ्या केलेल्या मोदींच्या आभासी प्रतिमा कोलमडून पडल्या आहेत. 

करोनाच्या दुसऱ्या लाटेने मोदींचे खरे रूप व त्यांच्या तथाकथित  नेतृत्वाचे वास्तव उघडे – नागडे केले. 

नोटबंदी सारख्या अत्यंत फसलेल्या निर्णयातून व देशात केवळ ६०० करोना रुग्ण असतांना करोडो कामगार व गोर गरिबांना देशोधडीला लावणारा देशव्यापी लोकडाऊन चा निर्णय हें खरे तर मोदींच्या घातकी नेतृत्वाचे ठळक पुरावे असतांना गोदी मीडियाने व निर्बुद्ध भक्तांनी त्याच गंभीर चुकांना डोक्यावर घेतले. 

त्या निर्बुद्ध भक्तांच्या भक्तीचे व कार्पोरेट्स प्रणित फॅसिझम ने उभ्या केलेल्या एका खुज्या नेत्याच्या भयावह निष्क्रियतेचे व असंवेदनशीलतेचे, जनतेच्या आरोग्यापेक्षा  ‘धर्म व सत्ते’ ला प्राधांन्य देण्याचे गंभीर परिणाम आज देशाला भोगावे लागत आहेत.

प्राणवायू शिवाय प्राण गमावत असणाऱ्या हजारो लोकांच्या आक्रोशात मोदींचा चिखलाने बनलेला पुतळा पुरता विरघळत  चालला आहे…❗

 – डॉ.संजय दाभाडे, पुणे

   sanjayaadim@gmail.com

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles