Wednesday, August 17, 2022
Homeराज्यशिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, MSCE चा मोठा निर्णय

शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर, MSCE चा मोठा निर्णय

spot_imgspot_imgspot_imgspot_img

पुणे (सुशिल कुवर) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीनं घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा टीईटी परीक्षा 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार होती मात्र आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं टीईटीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतला आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार टीईटी परीक्षा ही 31 ऑक्टोबरला होणार आहे. 

10 ऑक्टोबरला घेण्यात येणारी टीईटी परीक्षा ही आता 31 ऑक्टोबरला होणार असल्याने या परीक्षेचे प्रवेशपत्र देखील आता 14 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान मिळणार आहेत. हे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेच्या https://mahatet.in या अधिकृत वेबसाईट वरून डाउनलोड करता येणार आहे.

टीईटी परीक्षेचे दोन पेपर असतात. यामध्ये एक 1 ली ते 5 वी आणि 6 वी ते 8 वी इयत्तेतील शिक्षक भरतीसाठी ही परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली आहे. टीईटीचा पेपर क्रमांक 1 देण्यासाठी दोन वर्षांचा शिक्षणशास्त्र विषयातील डिप्लोमा म्हणजेच डीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याशिवाय दुसऱ्या पेपरसाठी डी.एड उत्तीर्ण असणारे उमेदवार, पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक, शिक्षणशास्त्र विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

टीईटी परीक्षेचं वेळापत्रक

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ स. 10:30 ते दु 1:00

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ 31/10/2021 वेळ दु. 2:00 ते सायं. 4:30

व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय