Wednesday, August 17, 2022
Homeग्रामीण'बैलगाडा शर्यत' संदर्भात खासदार डॉ.कोल्हे यांचं केंद्रीय मंत्र्याना पत्र, पहा काय म्हणाले...

‘बैलगाडा शर्यत’ संदर्भात खासदार डॉ.कोल्हे यांचं केंद्रीय मंत्र्याना पत्र, पहा काय म्हणाले !

spot_imgspot_imgspot_imgspot_img

संरक्षित प्राण्यांच्या यादीतून ‘बैल’ हा प्राणी वगळा – खा. कोल्हे

शेलपिंपळगाव / रवींद्र कोल्हे : गेल्या अनेक वर्षांपासून बैलगाडा शर्यतीला बंदी घालण्यात आली असून, बंद पडलेली शर्यत पुन्हा सुरू करण्यासाठी संसदरत्न खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू असतांनाच व बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठीचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असतांनाच केंद्रीय मंत्रिमंळात फेर बदल झाले. आणि ते प्रयत्न तेथेच थांबले. मात्र आता हताश न होता पुन्हा एकदा ताज्या दमाने आणि त्याच इर्षेने प्रयत्न सुरू जारी ठेवलेले खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी (दि.४ ऑगस्ट )रोजी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची भेट घेऊन बैल हा प्राणी संरक्षित प्राण्यांचा यादीतून वगळण्याची मागणी केली आहे.

या भेटीत खासदार डॉ.कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतींचा थरार..sss…! त्याचबरोबर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आर्थिक भार सोसून, स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन बैलांची काळजी घेत आहेत. अशा कठीण परिस्थितीतही बैलांचे संगोपन शेतकरी करतात. ग्रामीण भागात ‘बैलगाडा शर्यत’ हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी बैलांची काशी काळजी घेतात, त्यांचे संगोपन कसे केले जाते याचा व्हिडिओ पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांना दाखवला. त्याच बरोबर बैलगाडा शर्यतीला पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यातील ‘बैलगाडा शर्यतींना’ ४०० वर्षांची परंपरा व संस्कृती याची माहिती दिली. 

बैलगाडा शर्यतीतून ग्रामीण अर्थव्यवस्थेला कशी चालना मिळते हा मुद्दा स्पष्ट केला. महत्वाचे म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी ‘बैलगाडा शर्यती’ आकर्षणाचे केंद्र ठरू शकते आणि त्यातूनच पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते. हा वेगळा आणि अतिशय महत्वाचा मुद्दा खा.डॉ.कोल्हे यांनी यावेळी मांडला. 

गेल्या अधिवेशनात तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा बैलगाडा शर्यतीबाबत माहिती दिली होती. त्याचप्रमाणे ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याची आग्रही मागणी केली होती. त्यांच्याबरोबर सकारात्मक चर्चाही झाली होती. चर्चेदरम्यान केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह सकारात्मक प्रतिसाद देत जॉईंट सचिवांसोबत बैठक आयोजित केली होती. त्यामुळे या अधिवेशनात ‘बैल’ हा संरक्षित प्राण्यांचा यादीतून वगळण्याची काही सकारात्मक घडेल अशी अपेक्षा खासदार डॉ.कोल्हे यांना होती. मात्र केंद्रीय मंत्रिमंडळात झालेल्या फेरबदलात पशुसंवर्धन खात्याचा कारोभार पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यामुळे खा.डॉ.कोल्हे यांना पुन्हा नव्याने प्रयत्न करावे लागले. त्यांनी पशुसंवर्धन मंत्र्यांच्या भेटीत बैलगाडा शर्यतींचा इतिहास व परंपरा यांची माहिती दिली.बैलगाडा शर्यत बंद पडल्याने ग्रामीण भागातील यात्रा-उत्सव ओस पडू लागले असून त्याचाच परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कशापद्धतीने होत आहे. याची सविस्तर  माहिती केंद्रीयमंत्री पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांना दिली.

या शिवाय खिलार जातीचा बैल केवळ शर्यतीसाठी वापरला जातो, त्याचा शेतीसाठी वापर होत नाही. परिणामी देशी खिलार जातीच्या बैलांची संख्या पशुगणनेत (खाणेसुमारी) ५५ टक्क्यांनी कमी झाली आहे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे खिलार जातीचा हा देशी गोवंश चालविणे व त्याचे संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. असेही केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या निदर्शनास आणून दिले. म्हणून देशी गोवंश वाचविण्यासाठी ‘बैल’ हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यात यावा अशी मागणी खा.डॉ.कोल्हे यांनी पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

“पशुसंवर्धन मंत्री रुपाला यांनी सर्व विषय सविस्तर समजावून घेतला असून, या पूर्वी झालेल्या चर्चेची माहिती तत्कालीन मंत्री गिरीराज सिंह यांच्या सचिवांकडून घेऊन त्यांनी काय कार्यवाही केली. त्याचा आढावा घेऊ असे रुपाला यांनी सांगितले असून, या विषयात लक्ष घालून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याचा संकेत दिला आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की, “बैलगाडा”शर्यती पुन्हा सुरू होण्यासाठी नक्कीच सकारात्मक निर्णय होईल.”

– डॉ.अमोल कोल्हे, खासदार


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय