Friday, December 27, 2024
Homeजुन्नरशिवनेरीवर खा. अमोल कोल्हे यांचे 'भगवा जाणीव आंदोलन' 

शिवनेरीवर खा. अमोल कोल्हे यांचे ‘भगवा जाणीव आंदोलन’ 

जुन्नर : किल्ले शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा ध्वज असावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी “शिवजयंती साजरी करणारच पण मुख्यमंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत किल्ले शिवनेरी येथे होणाऱ्या शिवजयंतीच्या शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार” हे भगवा जाणीव आंदोलन १९ फेब्रुवारी २०२३ रोजी शिवजयंती निमित्त करणार असल्याचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जाहीर केले आहे.

याबाबतचा खा. कोल्हे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या खा.कोल्हे म्हणतात, शिवजयंती साजरी करणारच आहे, पण किल्ले शिवनेरीच्या शासकीय शिवजन्मोत्सवावर बहिष्कार टाकणार आहे. शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्याची मागणी अनेकदा राज्य आणि केंद्र सरकारकडे केली होती. मात्र, त्यावर निर्णय न घेतल्याने आपण आता शिवनेरी गडावर जाणार असून खाली शिवप्रेमींसोबत थांबणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जे केंद्र सरकार जर 370 कलम हटविण्याची गोष्ट करते तर तेच केंद्र सरकार पुरातत्व खात्याच्या छोट्याशा नियमावलीत सुधारणा करू छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान करू शकत नाही? असा सवालही खा. कोल्हे यांनी केला आहे.

खा. कोल्हे म्हणाले, शिवनेरी वर तर जाणारच. पण वर शासकीय कार्यक्रम सुरू असताना सर्वसामान्य शिवभक्तांना खाली अडवून ठेवले जाते. या शिवभक्तांसोबत मी असेल. त्या शिवभक्तांसोबत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन गड चढणार असून कुठल्याच शासकीय कार्यक्रमात सहभागी होणार नाही असे त्यांनी सांगितले.

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय