मुरादाबाद : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये (Moradabad) भररस्त्यात एका तरुणाने स्कूटरवरून जाणाऱ्या पती-पत्नीवर अश्लील कमेंट करून त्रास देण्याचा प्रयत्न केला. हे या तरुणाला चांगलेच महागात पडले. संतप्त महिलेने चप्पल काढून भररस्त्यात त्याला जबर मारहाण केली. त्यानंतर तिच्या पतीनेही या तरुणाची चांगलीच धुलाई केली.
काय घडले नेमके? (Moradabad)
30 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता पती-पत्नी स्कूटरवरून जात असताना एका तरुणाने महिलेवर अश्लील कमेंट्स आणि हावभाव केल्याची माहिती आहे. सदर महिलेचा पती हा दिव्यांग असल्याचीही माहिती आहे. संतप्त झालेल्या महिलेने चप्पल काढली आणि तरुणाला भररस्त्यात चोप दिली. तिच्या पतीनेही तरुणाला चांगलाच धडा शिकवला. मुरादाबादच्या एका दुकानासमोर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील दुकानासमोरच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नागरिकांचा संताप
स्थानिक नागरिकांनी महिलेच्या धाडसाचे कौतुक केले असून, अशा समाजविघातक प्रवृत्तीला धडा शिकवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. पोलिसांनीही या घटनेची दखल घेतली असून, या प्रकाराचा अधिक तपास सुरू आहे. या संदर्भातील वृत्त एका हिंदी वृत्तसंस्थेने दिले आहे.


हे ही वाचा :
मोठी बातमी : सापुतारा येथे बस दरीत कोसळून 7 मृत्यूमुखी, 15 जखमी
शेतकऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ; जाणून घ्या 10 महत्त्वाच्या घोषणा
इंडिया पोस्टबाबत निर्मला सीतारामन यांची अर्थसंकल्पात मोठी घोषणा
ब्रेकिंग : थोड्याच वेळात अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार देशाचा अर्थसंकल्प
पुणे हादरलं | आईचे अनैतिक संबंध ; अल्पवयीन मुलाकडून तरूणाची हत्या
धक्कादायक : पालकांनी मोबाईल काढून घेतल्याच्या रागातून 13 वर्षीय मुलाची आत्महत्या
क्रिकेट खेळण्यावरून वाद ; स्टंपने मारहाण, १३ वर्षीय मुलाचा मृत्यू