Friday, November 22, 2024
Homeजिल्हाMonsoon : सातारा, कराड मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

Monsoon : सातारा, कराड मध्ये पावसाची जोरदार बॅटिंग

सातारा : सातारा जिल्ह्यात दि. २३ रोजी दुपारी ३.३० वा मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. साताऱ्याच्या कराड शहर परिसर, तालुक्यातील अनेक गावात सोसाट्याचा वारा तुफानी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. विजांचा कडकडाटासह जोरदार पडत असलेल्या पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग खुश झाला आहे. Satara news

हवामान खात्याच्या माहितीनुसार (IMD) पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून वेगवान उष्ण वारे गुजरातमध्ये वाहत आहेत, त्यामुळे राज्याच्या अनेक भागात उष्णतेचा कहर झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी चिंचवड, सातारा, कराड, सांगली सह खेडोपाडी उष्णतेची लाट गेले चार दिवस पसरली आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होऊन पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

विजांच्या कडकडाटासह आज वादळी वारे आणि तुफान पावसाने सातारा, कराड शहर परिसर ग्रामीण भागात वातावरण थंडगार झाले आहे.

सध्या संपूर्ण देशात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण पाहायला मिळत आहे. दोन दिवसात मान्सून बंगालचा उपसागर आणि अंदमान निकोबार मार्गे केरळ येथे पोचणार आहे. असे हवामान खात्याने म्हंटले आहे. IMD

संबंधित लेख

लोकप्रिय