‘वास्तू रचना – नियोजन शिक्षण, संशोधन आणि व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ’ या विषयावरील दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : दि.१७ जुलै- वास्तुशास्त्रामधील तंत्रज्ञानाचा झपाट्याने विकास होत असून अनेक क्षेत्रांमध्ये नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहे याचा फायदा वास्तू रचनेमध्ये देखील करता येणे शक्य आहे. अगदी कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वास्तू रचनेमध्ये उपयोग करून घेणे सहज शक्य आहे वास्तु रचनाकारांनी या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सढळ हस्ते केला पाहिजे. हे तंत्रज्ञान वास्तु रचनेसाठी उपयुक्त आहे, असे मत, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष प्रा. आर्किटेक्ट अभय पुरोहित यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन यांच्यावतीने ‘वास्तू रचना – नियोजन शिक्षण, संशोधन आणि व्यवसायाचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ’ या विषयावरील दोन दिवसांच्या आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन कौन्सिल ऑफ अर्चिटेक्टचर चे अध्यक्ष प्रा. आर्किटेक्ट अभय पुरोहित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ उज्ज्वला चक्रदेव, सीओए टीआरसी संचालिका आर्किटेक्ट जयश्री देशपांडे, आर्किटेक्ट डॉ. स्मिता खान, बीएनसीएच्या संशोधन आणि विकास प्रमुख डॉ. वसुधा गोखले, एलटीएचे आर्किटेक्ट लक्ष्मण थिटे, किमयाचे आर्किटेक्ट किरण कलमदानी, पुणे महापालिका नगररचना विभागाचे निवृत्त उपसंचालक आर्किटेक्ट रामचंद्र गोहाड, बीएन सीएच्या डॉ. मीरा शिरोळकर, पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, एस. बी. पाटील आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, सीओइपी टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या डॉ. आरती पेटकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे शाखा प्रमुख डॉ. मनोहर चासकर, न्यूझीलंड येथील आर्किटेक्ट ज्युलियन रेनी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरचे महाराष्ट्र चॅप्टरचे चेअरमन आर्किटेक्ट संदीप बावडेकर, आर्किटेक्ट पुष्कर कानविंदे आदी उपस्थित होते.
यावेळी ‘शोधनिबंध प्रक्रिया’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी बनवलॆल्या कला दालनाचे उदघाटन प्रा. आर्किटेक्ट अभय पुरोहित, पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांनी नमूद केले की , वास्तुशास्त्राचा अभ्यास करताना अनेक घटकांचा विचार करावा लागतो. त्यासाठी अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरू करण्याची गरज आहे. शिक्षकांसाठीही प्रशिक्षण वर्ग सुरू केले पाहिजेत. त्यामुळे ज्ञानामध्ये भर पडते. ज्ञानामुळे प्रगल्भता येते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आंतरराष्ट्रीय ते राष्ट्रीय स्तरावरील शेवटच्या घटकापर्यंत ज्ञान पोहोचवण्याची जबाबदारी येते. त्यातून प्रगती साधण्यास मदत होते. वास्तु विशारद अनेक जबाबदाऱ्या स्वीकारून त्या यशस्वीपणे पार पाडण्यात निष्णात असतो, असे चक्रदेव यांनी सांगितले.

डॉ. स्मिता खान म्हणाल्या की, पीएचडीचे शिक्षण घेताना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग नोंदवून, अभ्यासाद्वारे शोधनिबंध सादर केले पाहिजे तरच प्रगती करता येणे शक्य आहे. अभ्यासक्रमामध्ये लवचिकता असली पाहिजे. शिक्षणाचा आनंद घेत अनुभव जमा करत मिळवलेले शिक्षण हे अधिक फायदेशीर असते असे त्यांनी सांगितले. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आर्किटेक्ट शाश्वती सिंन्हाल , आर्किटेक्ट ऋतूराज कुलकर्णी, आर्किटेक्ट तन्वी गणोरकर, आर्किटेक्ट अक्षता बेहरे, आर्किटेक्ट दक्षा देशमुख, आर्किटेक्ट प्रियांका गजभर, आर्किटेक्ट प्रियांका डुमणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. स्वागत डॉ. महेंद्र सोनवणे, सूत्रसंचालन आर्किटेक्ट निलिमा भिडे व आभार आर्किटेक्ट ऋतुजा माने यांनी मानले.


हे ही वाचा :
आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात, ‘ही’ विधेयक मांडली जाणार
समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेलेली महिला फोटोच्या नादात गेली वाहून
अभिनेता अभिषेक बच्चन राजकारणात प्रवेश करणार ? ‘या’ पक्षात होणार सहभागी चर्चांना उधान
धक्कादायक : ब्लेडने गुप्तांग कापून २० वर्षीय विद्यार्थ्यांची आत्महत्या
‘सीमे’पलीकडची सीमा हैदर कोण? चर्चेला उधाण
MBMC : मिरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत भरती; ई-मेल द्वारे करा अर्ज
मेगा भरती : महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालय अंतर्गत 1782 जागांसाठी भरती