ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड हा राज्यमहामार्ग असून या रस्त्याची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, मेट्रो तसेच ठाणे महापालिकेच्या माध्यमातून केली जाते. (MNS)
या पावसाळ्यात येथे मोठे खड्डे पडले आहेत, त्यामुळे नागरिक, वाहनचालक त्रस्त झाले आहेत, सततच्या पावसामुळे वाहनांची रखडपट्टी होऊन वाहतुक कोंडी होत आहे. (MNS)
ठाणे शहरात विविध ठिकाणी रस्ते विकासाची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे, असा नागरिकांचा आरोप आहे. पावसाच्या संततधारेमुळे घोडबंदर रोडवरील उड्डाणपुल तसेच सेवा रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. (MNS)
सोमवारी सांयकाळी मनसेचे शहर प्रमुख रविंद्र मोरे यांनी आपल्या समर्थकांसह येथील वेदांत हॉस्पीटल समोरील रस्त्यावर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्ते याच खड्यात बसले होते. यावेळी पदाधिकाºयांनी कशाला गाताय विकासाचे गाणे, खड्यात गेले सगळेच ठाणे, आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत हे आंदोलन केले. (MNS)
ठाणे शहरात खड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे, दुचाकीस्वार पडत आहेत, त्याला जबाबदार कोण, यावर तत्काळ उपाय करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाईलने आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी मोरे यांनी दिला.