Wednesday, August 17, 2022
Homeराज्यआमदार प्रताप सरनाईक यांनी दंड थोपटले ! माजी खासदार किरीट सोमैय्यांवर केला...

आमदार प्रताप सरनाईक यांनी दंड थोपटले ! माजी खासदार किरीट सोमैय्यांवर केला दावा दाखल

spot_imgspot_imgspot_imgspot_img

मुंबई / रवींद्र कोल्हे : “शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना फितूर करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर, माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी आमदार प्रताप सरनाईक यांची बदनामी सुरू केली! प्रकरण सहणधशीलतेच्या आवाक्याबाहेर गेल्याने अखेर आमदार प्रताप सरनाईक यांनी माजी खासदार किरीट सोमैय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा खटला ठाणे न्यायालयात दाखल केला आहे.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी गेल्या काही महिन्यात बिनबुडाचे, निराधार अन् बेजबाबदार आरोप करून आमदार सरनाईक यांची बदनामी करण्यासाठी प्रचार केला होता. त्यानंतर आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते की, किरीट सोमैय्या यांनी त्यांनी माझ्या विरुद्ध चालविलेला प्रचार बंद करून माफी मागितली नाही तर त्यांच्या विरुद्ध मानहाणीचा खटला दाखल करू! माजी खासदार सोमैय्या यांना संधी देऊनही त्यांनी माफी मागितली नाही. अखेर आमदार सरनाईक यांनी माजी खासदार सोमैय्या यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे. सोमैय्या यांचेवर दाखल झालेल्या आरोपांना ठाणे न्यायालयात उत्तर द्यावे लागेल.

दरम्यान आमदार सोमैय्या यांना फितूर करण्यासाठी प्रथम ईडी कारवाई आणि नंतर शिवसेनेने भाजप बरोबर जुळवून घेण्यासाठी मध्यस्थी करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तो सफल झाला नाही. मग सोमैय्या यांना बदनामी करण्यासाठी सोडले आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना गोटातून येत आहे !


व्हाट्सऍप ग्रुप सहभाग

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

संबंधित लेख

WhatsApp Group

आमच्या बातम्या थेट आपल्या मोबाईल मध्ये वाचण्यासाठी आजच सदस्य व्हा.

- Advertisment -

लोकप्रिय