Monday, March 17, 2025

आमदार जिग्नेश मेवानी यांना ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा कारण ..!

गुजरात :२०१६ मधील एका दंगलीच्या प्रकरणात गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि आमदार जिग्नेश मेवानी यांच्यासह अन्य १८ जणांना सहा महिन्यांच्या साध्या तुरुंगवासाची शिक्षा येथील न्यायालयाने शुक्रवारी सुनावली.मेवानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या रास्ता रोको आंदोलनाशी संबंधित हे प्रकरण आहे.

याप्रकरणी मेवानी आणि इतरांविरोधात २०१६ मध्ये येथील विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुजरात विद्यापीठाच्या विधि विभागाच्या तेव्हा बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी मेवानी आणि इतरांनी हे रास्ता रोको आंदोलन केले होते. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी पी. एन. गोस्वामी यांनी ही शिक्षा सुनावली. मेवानी आणि अन्य आरोपींना आर्थिक दंडही ठोठावण्यात आला आहे. या शिक्षेविरोधात वरच्या न्यायालयात दाद मागणे आरोपींना शक्य व्हावे, यासाठी शिक्षेच्या अंमलबजावणीला १७ ऑक्टोबपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles