Ministry of Revenue (वर्षा चव्हाण) – राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात व मालमत्ता नोंदणीच्या नियमांत मोठे महत्त्वाचे बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. मग आता हे बदल काय आहेत? जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती (Ministry of Revenue)
भारतातील जमीन आणि मालमत्तेची नोंदणी ही एक महत्त्वाची कायदेशीर प्रक्रिया असून सरकारने प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि कार्यक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आणि त्यांचा मुख्य उद्देश नोंदणी प्रक्रिया डिजिटल करणे, फसवणूक रोखणे आणि प्रक्रिया सुलभ करणे आहे.
या नवीन नियमांनुसार, जमीन नोंदणी प्रक्रियेत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. डिजिटल नोंदणी प्रक्रिया, आधार कार्डशी लिंकिंग आणि रजिस्ट्रीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग यासारखी पावले उचलण्यात आली आहेत. या बदलांमुळे केवळ वेळ आणि पैसा वाचणार नाही तर संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह होईल.
Ministry of Revenue
🟤जमीन नोंदणीचे चार नवीन नियम कोणते आहेत ?
1) नोंदणी प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार
2) आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य
3) नोंदणीचे व्हिडिओ रेकॉर्ड केले जातील
4) ऑनलाइन फी भरणे
🧾सातबारा उतारा म्हणजे काय?
सातबारा उतारा म्हणजे शेतजमिनीचा अधिकार अभिलेख. यात दोन प्रमुख भाग असतात:
– गाव नमुना-7 – कोणत्या व्यक्तीच्या नावावर किती जमीन आहे, हे दर्शवतो.
– गाव नमुना-12 – त्या जमिनीवर कोणत्या पिकांची लागवड झाली आहे, याची नोंद देतो.
सरकारने या दोन्ही भागांमध्ये सुधारणा करून त्याला अधिक स्पष्ट आणि वापरण्यास सोपे बनवले आहे.
🟣सातबारा उताऱ्यात करण्यात आलेले 11 महत्त्वाचे बदल
1.गावाच्या नावासोबत कोड क्रमांक – गाव नमुना-7 मध्ये आता गावाचा कोड क्रमांक दिसतो.
2.जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता – लागवडीयोग्य आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्रपणे दर्शवले जाते. आणि त्यांची एकूण बेरीज दाखवली जाते.
3.नवीन क्षेत्र मापन पद्धती – शेतीसाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’, तर बिनशेतीसाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येते.
4.खाते क्रमांकाची स्पष्टता – यापूर्वी ‘इतर हक्क’ मध्ये दिला जाणारा खाते क्रमांक आता थेट खातेदाराच्या नावासमोर असतो.
5.मयत खातेदारांच्या नोंदणीत बदल – मृत व्यक्ती, कर्जबोजे आणि ई-कराराच्या नोंदी कंसात दर्शवण्याऐवजी त्यावर आडवी रेष मारली जाते.
6.प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद – फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी ‘प्रलंबित फेरफार’ हा स्वतंत्र रकाना तयार केला जातो.
7.जुने फेरफार क्रमांक वेगळे – सर्व जुन्या फेरफार क्रमांकांसाठी वेगळा रकाना तयार करण्यात आला आहे.
8.खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा – दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष असणार, त्यामुळे नावे स्पष्टपणे वाचता येते.
9.गट क्रमांक आणि शेवटचा व्यवहार – गट क्रमांकासोबत शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख इतर हक्क रकान्यात शेवटी दाखवली जाते.
10.बिनशेती जमिनींसाठी नवीन बदल – बिनशेती क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हेच एकक राहणार असून, जुडी व विशेष आकारणी रकाने काढून टाकण्यात आले आहेत.
11.अकृषिक जमिनींसाठी विशेष सूचना – बिनशेतीच्या सातबारा उताऱ्याच्या शेवटी आता “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने गाव नमुना-12 लागू नाही” अशी सूचना दिली जाते.
Ministry of Revenue : मालमत्ता नोंदणीच्या नियमांत मोठे बदल, खाते क्रमांकापासून ते व्यक्तीचे नाव कमी करण्यापर्यंत सातबारा उताऱ्यात झालेले बदल माहित करून घ्या.
- Advertisement -