Saturday, March 15, 2025

रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

मुंबई  : तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी दिले. या संदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीत देसाई बोलत होते.

देसाई म्हणाले, तांबडी बु. येथील घटनेचा तपास नि:पक्षपातीपणे करावा, तपासात कोणत्याही तांत्रिक बाबींची उणीव राहणार नाही याची दक्षता घ्यावी. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषींवर कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांना दिले. गरज पडल्यास ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याबाबतही शासन स्तरावर विचार केला जाईल असे देसाई यावेळी म्हणाले.

या घटनेच्या चौकशीबाबतचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे व महेश राणे यांनी दिले.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles