Thursday, April 24, 2025
---Advertisement---
---Advertisement---

एमआयएमची महाविकास आघाडीला मोठी ऑफर, राज्यात नवी राजकीय समीकरणं जुळणार?

---Advertisement---

मुंबई : महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून भाजप  खिंडार पाडण्याची भाषा करतं आहे, तसेच सरकार पडण्याचे मुहूर्त देखील वारंवार सांगितले जात आहेत. असे असताना आता एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.

---Advertisement---

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेतली. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्यासाठी एमआयएम तयारी असल्याचे शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती जलील यांनी राजेश टोपेंना केली आहे. एमआयएम राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेस सोबत देखील जायला तयार आहे. या सोबतच केवळ औरंगाबाद महानगरपालिका असं नाही तर आगामी निवडणुकीत राज्यातही युती करायला तयार असल्याचे इम्तियाज यांनी म्हटले आहे. 

मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडणार? किरीट सोमय्या यांच्या ट्वीटमुळे खळबळ

इम्तियाज जलील म्हणाले की, आमच्यावर आरोप करण्यात येतो की भाजप आमच्यामुळे जिंकते. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भेटायला आले असता त्यांना ऑफर दिली आहे. एकदा हे संपवायचं असेल, तर तुम्ही आमच्यासोबत युती करायला तयार आहात का? त्यावर ते काही बोलले नाहीत. आता बघायचं आहे की त्यांना फक्त आरोप करायचे आहेत की त्यांना त्यांची भूमिका सिद्ध करायची आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी भाजपाला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवं, असं आवाहन केलं होतं. 

आम्ही कोणाकडून तेल घ्यावे हे तुम्ही सांगू नका – भारताचा कडक इशारा

सध्या राज्यात एक खासदार, दोन आमदार तर २९ नगरसेवक असे एमआयएमचे संख्याबळ आहे. आता एमआयएमची ही ऑफर महाविकास आघाडी स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles