Thursday, September 19, 2024
Homeजुन्नरयुक्रेनवरुन जुन्नरला सुखरुप परतलेल्या विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ मंचाच्या सदस्यांनी दिली सदिच्छा भेट

युक्रेनवरुन जुन्नरला सुखरुप परतलेल्या विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ मंचाच्या सदस्यांनी दिली सदिच्छा भेट

जुन्नर /आनंद कांबळे : युक्रेनवरुन जुन्नरला सुखरुप परतलेल्या विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ मंचाच्या सदस्यांनी घरी जावून सदिच्छा भेट दिल्याने कुटुंबीय भावनाशिल झाले.

जुन्नर मधील मंदिरा संजय खत्री, मलाईका रणजित चव्हाण, अक्षद रुपेश दुबे हे तीन विद्यार्थी युक्रेन येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. अनेक संकटाशी सामना करत ते ५ मार्चला आपल्या मायभूमीत परत आले. 

जुन्नर : माजी सभापती आणि त्यांच्या मुलावर बिबट्याचा हल्ला !

जुन्नर : निमगिरी येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा !

६ मार्चला या सर्वाच्या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होत, राजमाता जिजाऊ मंचाच्या अलका फुलपगार, ज्योती चोरडिया, राखी शहा, संगीता बेळे, रुपाली शहा, नयना राजगुरव, राजश्री कांबळे, ज्योस्ना महाबरे, चारुशीला घायवट, वैष्णवी पांडे, नेहा गाजरे, अनुराधा गरीबे, गीता डोके, सविता डोके, स्वाती पवार, सुरेखा जढर, विद्या मिरगुंडे, पूनम नरोटे, भूमिशा खत्री, ज्योती कदम, मंजू चव्हाण, स्वाती डोंगरे, मंगल शिंदे, रत्ना घोडेकर, वैशाली भालेकर, नंदा कानडे, केतकी देठे, संगीता नांगरे, सुजाता लुंकड आदि सदस्यांनी सदीच्छा भेट दिली. 

या विद्यार्थ्यांना पेढा भरवून, हारगुच्छ देवून कौतुक केले. मुलांनी त्यांचे अनुभव कथन केले ते ऐकताना महिलाःचे डोळे भरुन आले तर कुटुंबीय भावनाशिल  झाले.

जुन्नर : महिला दिनानिमित्त भव्य संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन, तहसिलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण

संबंधित लेख

लोकप्रिय